वजन कमी करण्यासाठीच्या इंजेक्शनचा जो प्रचार केला जातोय, त्यापासून सध्या आपणही दूर जाऊ शकत नाही.
लठ्ठपणाचा विषय आला की सोशल मीडियावर आपण अनेक 'बिफोर' आणि 'आफ्टर' म्हणजे वजन कमी होण्यापूर्वीचे आणि वजन कमी झाल्यानंतरचे फोटो पाहतो. हॉलिवूड स्टार्सबाबतच्या चर्चांचा तो स्त्रोत आहे. तर आता युकेचं नॅशनल हेल्थ सर्व्हीस त्यांच्यासाठी पैसे मोजणार आहे.
वाढलेलं वजन हे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतं आणि ते वाढत आपल्या आयुष्यातील कलंक वाटू लागते. त्यात डाएट आणि व्यायाम हा मंत्रही अनेकांसाठी अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालंय.
पण आपण वर विचारलेल्या प्रश्नात ज्या औषधाचा उल्लेख आहे त्या सेमाग्लुटाइडचा उपचारांसाठी वापर करणं चुकीचं असल्याचं काही डॉक्टरांचं मत आहे. अशा वेळी आपण त्याला "चमत्कार" किंवा "लठ्ठपणावरील औषध" म्हणावं का? याबाबतचा प्रचार खरा आहे का? की आपण लठ्ठपणाच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात अपयशी ठरत आहोत आणि लोकांना फक्त आयुष्यभर औषधांचं सेवन करायला भाग पाडत आहोत?
केंट येथील जॅन या सेमाग्लुटाइडच्या चाचणीमध्ये भाग घेणाऱ्या जगातील सुरुवातीच्या काही लोकांपैकी एक होत्या. वजन कमी करण्यासाठी वेगोव्ही (Wegovy) आणि मधुमेहासाठी ओझेम्पिक ( Ozempic) म्हणून त्याची विक्री झाली. काही लोक तर अजूनही वजन कमी करण्यासाठी हे खरेदी करत आहेत.
जॅनसारख्या अशा कोणाला तरी आपण प्रत्येक जणच ओळखत असतो, ज्यानं वजन किंवा कमरेचा घेर कमी करण्यासाठी प्रत्येक प्रकारचं डाएट केलेलं असतं आणि ती व्यक्ती आयुष्यभर त्यासाठी झटत असते.
आपण काही खाल्ल्यानंतर जे हार्मोन तयार होतात त्याची सेमाग्लुटाइड नक्कल करतं. त्यामुळं ते मेंदूला चकवा देतं आणि पोट भरलेलं आहे असं विचार करायला भाग पाडतं. परिणामी भूक कमी होते आणि आपण कमी खातो.
जॅननं जेव्हा हे इंजेक्शन घ्यायला सुरुवात केली त्यानंतर जेवण किंवा आहाराबरोबरचं त्यांचं नातं प्रचंड बदललं. एक तर हे औषधामुळं झालं असावं किंवा एलियन्सनी माझं अपहरण केलं असावं, असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रथमच त्या असा अनुभव घेत होत्या की, त्या कॅफेमध्ये गेल्या आहेत. त्यांच्यासमोर विविध प्रकारचे स्वादीष्ट पदार्थ आहेत आणि तरीही त्यांचं शरीर मलाही ते पाहिजे असं म्हणत नव्हतं.
त्याऐवजी, "मला भूक लागल्यासारखं वाटत नव्हतं. माझं शरिर मला सांगत होतं की, तुला खायचं नाही. पण ती माझी इच्छाशक्ती नव्हती," असा अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं.
सेमाग्लुटाइडमुळं दिसणारे परिणाम हे निर्विवाद आहेत, किमान काही काळासाठी तरी.
साधारणपणे चाचणीदरम्यान जेव्हा निरोगी जीवनशैलीसह सेमाग्लुटाइड घेतलं जातं तेव्हा लठ्ठ लोक अंदाजे 15% वजन कमी करण्यात यशस्वी होतात. हे स्किनी जॅब (एक प्रकारचे औषधी इंजेक्शन) नाही हे लक्षात घ्या. 15% टक्के म्हणजे तुमचे वजन 20 स्टोनवरून 17 वर आणते. (स्टोन हे वजन मोजण्याचे पाऊंड प्रमाणेच एक परिमाण आहे)
या अभ्यासात असं पाहायला मिळालं की पहिल्या वर्षी वजन कमी झालं. मात्र, नंतरचे तीन महिने वजन होतं तेवढंचं राहिलं. लोक वर्षानुवर्षे हे औषध घेतात तेव्हा नेमकं काय होतं, हे आम्हालाही माहिती नाही.
जॅन यांनी 28 किलो वजन(चार स्टोनपेक्षा अधिक) कमी केलं. याचा अर्थ म्हणजे त्यांना आता अखेर त्यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या गिफ्टचा आनंद घेता येणार होता. ते म्हणजे टायगर मॉथ विमानातून उड्डाण करता येणार होतं. कारण आधी वजनाच्या मर्यादेमुळं त्यांना ते करणं शक्य नव्हतं. "मला विविध प्रकारे उड्डाणं करायला आवडत होतं, मी त्याचा आनंद घेतला."
याचे परिणाम हे आपल्या नेहमीच्या डाएटच्या परिणामांपेक्षा अधिक आकर्षक वाटतात. कारण डाएटची सुरुवात चांगली होते, पण त्यात तुमचे कमी झालेले फॅट (चरबी) मेंदूला अन्न हवे असल्याचे संकेत देतात. त्यामुळं बहुतांश डाएट हे अपयशी ठरतात.
"जवळपास 90% पेक्षा अधिक लोकांचं वजन हे ते डाएटचा प्रवास सुरू करतात तेव्हा जेवढं होतं, तेवढंच डाएट बंद करताना असतं," असं मत मेटाबॉलिक डिसिज युनिटचे संचालक प्राध्यापक सर स्टिफन ओराहिली यांनी मांडलं.
ते या औषधांकडे "एका रोमांचक युगाची सुरुवात" असा दृष्टीनं पाहतात. कारण ही औषधं अशा लोकांना मदत करतात, ज्यांनी त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या वजनाबरोबर दीर्घकाळ संघर्ष केलेला असतो.
जॅन यांची चाचणी संपली. पण नंतर त्या सेमाग्लुटाइड घेऊच शकत नव्हत्या. या औषधाशिवाय आता त्यांच्या मेंदूला पोट भरलेलं आहे, असा विचारच करून फसवता येत नव्हतं.
"माझं वजन पुन्हा वाढायला लागल्यामुळं मी काहीशी अस्वस्थ होते," असं त्या म्हणाल्या. त्यांना जो कोणी ते औषध देऊ शकेल, त्याला त्या काहीही द्यायला तयार होत्या.
त्यांनी वजन कमी करण्यासाठीच्या इतर इंजेक्शनचाही वापर करून पाहिला. पण अखेर त्यांनी मोठी शस्त्रक्रिया करून पोटाचा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्यामुळं त्यांना लवकर पोटं भरलेलं आहे असं वाटणार होतं.
जॅन यांना या सर्वाचं काहीही दुःख नाही. अजूनही त्यांच्या मते ते औषध म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली बाब आहे.
वजन पुन्हा वाढतेच
त्यांचा अनुभव हा इतरांपेक्षा फार काही वेगळा नाही. सेमाग्लुटाइडचं सेवन बंद केल्यानंतर वजन वाढणं हे अगदी सर्वसामान्य आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्वात दीर्घकालीन माहितीचा विचार करता, याचं सेवन बंद केल्यानंतर लोकांचं दोन वर्षांमध्ये अंदाजे दोन तृतीयांश वजन पुन्हा वाढलेलं असतं.
"वजन पुन्हा वाढू नये यासाठी हे औषध घेत राहावं लागतं असं दिसतंय आणि माझ्या मते तीच मोठी समस्या आहे," असं मत डॉक्टर मार्गारेट मॅककार्टनी यांनी व्यक्त केलं.
NHS हे सेमाग्लुटाइडचं केवळ दोन वर्षांसाठी सेवन करण्याचा सल्ला देतं. म्हणजे लोक वेट लॉस क्लिनिकमध्ये जेवढ्या काळासाठी जाऊ शकता, तेवढ्याच काळासाठी. मग जर औषध बंद केल्यानंतर वजन पुन्हा वाढत असेल, तर याचा फायदा काय? हे विचारण्यात काहीही गैर नाही.
"वजन कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहिलेल्या आणि झगडलेल्या लोकांसाठी हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला काहीतरी कामी येत आहे असं लक्षात आल्यानंतर, NHS ते पुन्हा मागं घेतं हे माझ्या मते तरी काहीसं चुकीचं आहे," असं डॉ मॅककार्टनी म्हणाल्या.
नक्कीच अशा काही परिस्थिती असतात, जेव्हा तातपुरते वजन कमी करणे हे फायद्याचे ठरत असते. शिवाय शस्त्रक्रिया आणि काही इतर उपचार हे अगदी आवश्यक असलेल्या मोजल्या लोकांसाठीच वापरले जातात.
हे औषध अद्याप नवीन आहे आणि त्याच्या दीर्घकाळातील वापराचे फायदे-तोडे अद्याप माहिती नाहीत. याच्या दुष्पपरिणामांमध्ये उलटी होणे, थकवा आणि पॅनक्रियाजला सूज येणे याचा समावेश होतो.
वैद्यकीय विजय की सामाजिक अपयश?
वैयक्तिक विचार करायचा झाल्यास, अशा प्रकारच्या औषधाची निर्मिती करू शकणं याचा आपण आनंद साजरा करायचा की, त्याउलट समाजात लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करण्यास आपण एवढे अपयशी झालो आणि आपल्याला त्यासाठी औषध शोधावे लागले याबद्दल दुःख व्यक्त करावं हे मला समजत नाही.
"आपल्यापैकी अनेकांचा याच्याशी सामना होत असतो," असं युनिव्हर्सिटी ऑफ ग्लास्गोमधील मेटाबॉलिक मेडिसीनचे प्राध्यापक नावीद सत्तार म्हणाले.
ते अगदी व्यवहारवादी दृष्टीकोनातून पाहतात. पृथ्वीवरील सुमारे अर्धे लोक हे 2035 पर्यंत लठ्ठ किंवा जास्त वजन असलेले असतील. त्यात वाढलेल्या वजनाचा टाइप 2 मधुमेहाशी आणि कर्करोगाशी संबंध आहे. मानवी शरिरामध्ये अन्न आणि जास्त खाण्याच्या मोहामुळं कॅलरीज पोसल्या जात असल्याचं ते म्हणाले.
त्यात बहुतांश रुग्ण हे सध्या वाढलेल्या वजनामुळं चार ते पाच समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळं आम्ही त्यांना फारसा विचार न करता प्राधान्य देतो, असंही ते म्हणाले.
डॉक्टर मॅककार्टनी यांच्या मते, जगात लोकांनी वजन वाढवल्यानंतर आपण त्यात वैद्यकीय हस्तक्षेप कसा करू शकतो, याचा विचार करण्याऐवजी, लठ्ठपणा कसा टाळता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे.
सेमाग्लुटाइड लठ्ठपणाबाबतचं चित्र बदलत आहे आणि त्याचे पर्यायही येण्याच्या मार्गावर आहेत.
प्राध्यापक ओराहिली यांच्या मते आपण लठ्ठपणाच्या सामाजिक कारणांवर उपाय शोधले तरीदेखील समाजात लठ्ठ लोक असतील आणि ते आजार पडत राहतील. त्यामुळं औषधं आपल्याला लठ्ठपणावर योग्य उपचार करण्याच्या नव्या जगाच्या मार्गावर नेतील असं त्यांना वाटतं.
पण तरीही ही औषधं वादग्रस्तचं असतील. तसंच आपण केवळ आरोग्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीनं त्यावर चर्चा केली आहे.
पण लोकांवरील याच्या परिणामाबाबत काही चिंता व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः सुंदर असण्याचा अर्थ सडपातळ असा समजला जातो. त्यामुळं चांगलं दिसण्याचा दबाव असलेल्या तरुण महिलांबाबत विचार करायला हवा.
सेलिब्रिटी कल्चरची भूमिका, सेमाग्लुटाइडची सल्ल्यानुसारच पण ऑनलाईन पद्धतीनं उपलब्धता होणं आणि खाण्यासंबंधींच्या विकारांवर होणार परिणाम हेही काही महत्त्वाचे प्रश्न आहेतच.
त्यामुळं सेमाग्लुटाइडबाबत तुम्ही काहीही विचार करत असले तरी, या औषधाबाबतची चर्चा आणि त्याचा प्रचार हा कमी होण्याची शक्यता नाहीच.
Published By- Priya Dixit