Dharma Sangrah

पाठ दुखीची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधक उपचार

Updated: सोमवार, 1 जुलै 2019 (14:16 IST)
 
पाठीच्या खालच्या भागाची वेदना डिस्क, रीढ़ आणि तंत्रिका, पाठीच्या खालच्या भागातील स्नायू, ओटीपोट आणि पेल्विक अंतर्गत अवयवांशी संबंधित असू शकते. वरच्या भागातील पाठीची वेदना जसे कि महाधमनीचा विकार, छातीत दुखणे आणि रीढ़ला सूज येणे.
 
कारण
मानसिक ताण
दुखापत, फ्रॅक्चर किंवा पडणे
डिस्क्स खराब होणे
स्नायू आकुंचन पावतात
ताणलेले स्नायू किंवा अस्थिबंध
 
अचानक, विचित्र हालचाली करणे  
खूप जड वजन उचलणे
चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे
 
संरचनात्मक समस्या
ऑस्टियोपोरोसिस
संधिवात
सिटीका
डिस्क बल्ज
डिस्क्स तुटणे
रीढ़ ला वक्राकार येणे
मूत्रपिंड समस्या
 
हालचाल आणि शरीराची विशिष्ठ ठेवण
पाठ दुखणे काही दररोजच्या क्रियाकल्पांमुळे किंवा खराब स्थितीमुळे होऊ शकते
दीर्घ कालावधीसाठी एकाच मुद्रेत बसून राहणे
काहीतरी जोराने आणणे, खेचणे, उचलणे
मानेला मागे- पुढे ढकलणे, जसे की वाहन चालवणे किंवा संगणक वापरणे
ब्रेक न घेता लांब पल्ल्याची सतत ड्रायव्हिंग
गादीवर झोपल्याने शरीराला आधार मिळत नाही आणि पाठीचा कणा सरळ राहतो
अनावश्यकपणे किंवा दीर्घ काळासाठी झुकून राहणे
शरीराला अति ताणने
खोकणे किंवा शिंकणे
प्रतिबंधात्मक उपाय
व्यायाम: व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या फिजियोथेरेपिस्टशी सल्लामसलत करा.
कोअर स्ट्रेंथनिंग- पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते.
फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंगचा मुख्य उद्देश म्हणजे स्पाइन, हिप्स आणि वरच्या पायातील भाग सुधारणे.
 
आहार: पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा समावेष करणे आवश्यक आहे कारण हे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. योग्य आहार योजना शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
 
शरीराचे वजन: विशेषतः आपल्या पोटाभोवती वाढलेले वजन तुमच्या पाठीवर ताण आणू शकते. अधिक काळ एकाच स्थिती मध्ये घालवल्यास मणक्याला अनैसर्गिक वक्रता येऊ शकते. डिस्क्स अतिरिक्त वजनांच्या दाबासाठीची उणीव भरून काढते, ते हर्निएटेड बनू शकतात, ज्यामुळे सायटॅटिका होतो. त्यामुले संधिवात देखील वाढू शकते.
 
धूम्रपान: निकोटीन डिस्कला रक्त प्रवाह करणे प्रतिबंधित करते, त्यामुळे कुशेरुक रिढच्या ऱ्हासाची पातळी वाढवते. त्यामुळे पाठीत दुखू शकते. याव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात धूम्रपान केल्याने खोकल्यामुळे वेदना होऊ शकतात.
 
उभे राहण्याची स्थिती: सरळ उभे रहा, डोके पुढच्या बाजूस सरळ असावे, दोन्ही बाजूंनी आपले वजन समतोल राखून ठेवा. तुमचे पाय सरळ ठेवा आणि आपले डोके मणक्याच्या रेषेमध्ये सरळ असावे.
 
उचलताना: वस्तू उचलताना, आपण शक्य तितके सरळ पुढे ठेवा, आपले पाय एका पायसह थोडे पुढे सरकवा जेणेकरुन तुमचे समतोल राहू शकेल. केवळ गुडघावर वाकवा, आपल्या शरीराच्या जवळ वजन धरून ठेवा आणि शक्य तितके कमीतकमी तुमच्या पाठीची स्थिती बदलताना पाय सरळ करा.
 
ड्रायव्हिंग: करताना पाठीला योग्य आधार घ्या. लांब प्रवासादरम्यान भरपूर विश्रांती घ्या.
 
बेड: असे मॅट्रेस असावे जे तुमच्या मणक्याला सरळ ठेवेल आणि तुमच्या खांद्याला आणि पार्श्वभागाचे वजन सांभाळायला हवे. उशीचा उपयोग करा, परंतु तुमच्या मानेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
 
शूज: फ्लॅट शूज वापरल्याने पाठीवर कमी ताण येतो

डॉ. श्रेयस काठारानी, फिजियोथेरपी विभागाचे प्रमुख जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

चेहऱ्यावर वेदना आणि डोळ्यांच्या मागे दाब? सायनस डोकेदुखीचे असू शकते लक्षण!

चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी ही योगासने करा, तुम्हाला लवकर झोप लागेल

जातक कथा : राणी आणि जादूगर; राजा बनला काळा हंस

'या' गोष्टी ऐकून थक्क व्हाल! जगातील १० सर्वात विचित्र नियम

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मसालेदार करवंदाची चटणी

पुढील लेख
Show comments