शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2019 (12:20 IST)

हेल्थकेअर मधील एआय आणि कटिंग एज टेक्नॉलॉजीचे महत्त्व

डॉ. जमशेद डी सुनावला, क्रिटिकल केअर युनिटचे सल्लागार आणि संचालक, जसलोक हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर आज कोणतेही उच्चं दर्जाचं हॉस्पिटल्स, आर्ट आयसीयूद्वारे प्रदान केलेल्या बॅकअप सेवे शिवाय सुपरस्पेशॅलिटी सुविधा कार्य करू शकत नाही. या संदर्भात असं म्हणता येईल कि, सेवांचे अद्ययावत आणि सुलभतेने उपलब्ध असलेल्या वातावरणात नवीनतम तंत्रज्ञानासह अत्यावश्यक वैद्यकीय पध्दतींसाठी उपयोग होतो.
 
जसलोक हॉस्पिटल मध्ये मध्ये आयसीयू, ओटी आणि हॉस्पिटलच्या इतर संवेदनशील क्षेत्रांमधून सुलभ प्रवेशासह संपूर्ण ४ थ्या आणि ५ व्या मजल्यावर अद्ययावत ICU उभाण्यात आले आहे. जेणेकरून नवनवीन उपकरणांचा लाभ लोकांना घेता येईल.
 
रुग्णाच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता मांडणीचे उत्कृष्टपणे नियोजन करणे गरजेचे आहे; आयसीयू अशा ठिकाणी हवे कि जिथे रुग्णांना लवकर आणि ताजेतवाने वाटेल. ICU चे डिझाईन नीटनेटके असायला हवे, ज्यामध्ये वेगवेगळ्या मशिन्स सहजरित्या रुग्ण पर्यंत पोचून त्यावर सहज उपचार करण्यास मदत होईल. रुग्णांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही यासाठी काळजी घ्यावी, तसेच त्यासाठी आधुनिक लिफ्टची सुविधा असावी. खुले रुंद कॉरिडॉर आणि आपत्कालीन एक्झिटची सुविधा असं तितकाच महत्वाचं आहे. सद्द्य स्थिती पाहता रुग्णासोबत येणारे नातेवाईकांसाठी २४ तास निवासाची सुविधाही असावी बऱ्याचदा त्यांची गैरसोय होताना आपण पाहत आहोत. 
 
आधुनिक हॉस्पिटलचा विचार करता त्यामध्ये अद्ययावत सेमिनार कक्ष असावेत, ज्यामध्ये रुग्णाला किंवा नातेवाईकांना आरोग्य शिक्षण प्रभावी माहिती, रुग्णाची काळजी कशी घ्यावी या बद्दल सल्ला देता येईल.