शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 11 जून 2019 (16:59 IST)

कच्ची पपई आरोग्यासाठी अतिशय चांगली

कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र कधी पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरुन तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळेस कधी पपई खाणे फायद्याचे ठरू शकते. 
 
कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'अ', 'ई' आणि 'क' असते. ही जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. सर्दी आणि पडसे यांचा कोणाला त्रास असेल कच्ची पपई खावी. मूत्रसंबंधी समस्यांचेही कधी पपई निराकरण करू शकते. 
 
शरीरावर अनेक नको असलेले केस उगवतात. हे अनावश्यक केस खराब दिसतात. दरवेळी वॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करावा. हा उपाय कोणत्याही दुखापतीशिवाय होतो.
 
कच्च्या पपईत असणारे पैपिन नावाचे एंझाईम हे शक्तीवर्धक असते आणि शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते.