सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (23:03 IST)

Reduce weightवजन कमी करताना होतात या चुका

Weight Loss
आपण खूप दिवसापासून वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय अमलात आणत आहात तरी वजन कमी होत नाहीये याचा अर्थ आपण काही चुका करत आहात. अशात वजन कमी करायचे असेल या चुका दुरुस्त करून योग्य परिणाम मिळवू शकता.
 
 ब्रेकफास्ट टाळणे
ब्रेकफास्ट टाळणे ही सर्वात मोठी चूक ठरेल. ब्रेकफास्ट करणे अत्यंत आवश्यक असतं कारण याने दिवसभर धावपळ करण्याची शक्ती प्राप्त होती. नाश्त्यात आपल्याला प्रोटीन आणि फायबर आढळणारे पदार्थ सेवन केले पाहिजे.
 
मॅक्रोन्यूट्रिएंट्सला गंभीरपणे न घेणे
कार्ब, प्रोटीन आणि फॅट्सने भरपूर आहार मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतात. कार्ब आणि प्रोटीन नसलेले आहार सेवन करणे आवश्यक आहे. यासाठी दररोज अंडी, ट्यूना, रोस्टेड चिकन, डाळ आणि सोयाबीनचे सेवन करावे.
 
लो फॅट आहार घेणे
डायटच्या फिराकीत आपण अनेकदा बाजारातून असे पदार्थ निवडता ज्यावर लो फॅट किंवा जिरो फॅट असे लिहिलेलं असतं. परंतू फॅट्स नाही हा विचार करून या पदार्थांचा सेवन अती मात्रेत करण्यात येतं, हे चुकीचे आहे. असे पदार्थही लिमिटमध्ये सेवन केले पाहिजे. आपल्या आहारात हेल्दी फॅटदेखील जसे साल्मन, जवस, अक्रोड आणि बदाम सारखे पदार्थ सामील केले पाहिजे.
 
टीव्ही बघत-बघत जेवणे
अनेक लोकं जेवताना टीव्ही बघणे पसंत करतात. अशाने जेवण्यावरून लक्ष दूर होतं आणि अनेकदा भुकेपेक्षा अधिक आहार घेतला जातो. अशा कारणाने लठ्ठपणा वाढतो म्हणून जेवताना लक्ष केवळ जेवण्यावर असावे ना की इतर मनोरंजनावर. जेवताना मोबाइल वापरणेही टाळावे.
 
सोपे व्यायाम
अनेकदा तासोंतास व्यायाम केल्यावरही वजन कमी होत नाही कारण सोपे व्यायाम किती तरी तास केले तरी त्याने फरक पडत नाही. जेव्हा आपल्या ध्येय वजन कमी करणे हाच आहे तर हार्ड वर्कआउटची गरज असते. यासाठी अधिक वेळ देण्याचीही गरज भासत नाही.