Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्यायाम म्हणजे काय? महिलांसाठी घरकाम हा व्यायामाला पर्याय ठरू शकतो?

Updated: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (15:14 IST)
 
शारीरिक हालचाल कमी असणाऱ्या माणसांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. डायबेटिस होण्याचं प्रमाणही जास्त असतं.
 
काहींना शारीरिक हालचालींच्या अभावी कॅन्सरही होण्याची शक्यता असते.
 
शारीरिक हालचाली, व्यायामाचा अभाव असेल तर माणसाच्या मेंदूवरही परिणाम होण्याची शक्यता असते.
 
या अहवालानुसार, भारतातल्या 43 टक्के महिला शारीरिकदृष्ट्या कमी हालचाल असणाऱ्या आहेत. देशातल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण 23.5 टक्के आहे. शारीरिकदृष्ट्या सगळ्यात निष्क्रिय होण्याची नामुष्की कुवेतवर ओढवली आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्यांचं सर्वाधिक प्रमाण युगांडात सगळ्यांत जास्त आहे.
 
हा अहवाल म्हणजे 168 देशांपैकी घेण्यात आलेल्या 358 सर्वेक्षणांचं निष्कर्ष आहे.
 
शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह म्हणजे नक्की काय?
राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, शारीरिक हालचाल म्हणजे ज्यात संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर वेगवान चालणं, वॉटर एरोबिक्स, सायकल चालवणं, टेनिस खेळणं हे सगळं शारीरिक हालचालींमध्ये मोडतं.
 
प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किमान दीडशे मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना 'शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह' म्हटलं जाऊ शकतं.
 
एरोबिक्स व्यायामामुळे हृद्याचे ठोके वाढतात. श्वास वर-खाली होतो, शरीरात उष्णता निर्माण होते. हे सगळं शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्यात मोडतं.
 
शॉपिंग, स्वयंपाक करणं, घरातली छोटी-मोठी कामं करणं म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्रिय होत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे फायदा होत नाही असं नाही. या कामांमुळे शारीरिक हालचालींचं स्वरुप बदलतं.
 
कोणाला किती व्यायामाची आवश्यकता?
- 5 ते 18 वयोगटातल्या मुलामुलींसाठी दररोज तासभर शारीरिकदृष्ट्या दमवणारी हालचाल आवश्यक आहे.
 
- 19 ते 64 वयोगटातील प्रौढांसाठी प्रत्येक आठवड्याला दीडशे मिनिटं शरीराची सर्वांगीण हालचाल असा व्यायाम आवश्यक आहे.
 
- 65 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आठवड्याला दीडशे मिनिटं व्यायाम आणि आठवड्यातून दोन दिवस ताकदीसाठी देणं आवश्यक मानलं गेलं आहे.
 
व्यायामात नक्की काय येतं?
वेगानं चालणं, पोहणं, सायकल चालवणं, टेनिस, हायकिंग, स्केटबोर्डिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या सगळ्यांमधून मजबूत शारीरिक व्यायाम घडतो.
 
व्यायाम का आवश्यक?
राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार जी माणसं नियमितपणे व्यायाम करतात त्यांच्यामध्ये
 
- हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित विकारांचं प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होतं.
 
- व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप2 डायबेटिस होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी कमी होते.
 
- कोलोन किंवा रेक्टल कॅन्सर होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी कमी होते.
 
- स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी कमी होते.
 
- आकस्मिक निधन होण्याचा धोका 30 टक्क्यांनी कमी होते.
 
- हाडांचा आजार होण्याचं प्रमाण 83 टक्क्यांनी कमी होते.
 
महिला शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय का?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये शारीरिक हालचालीचं, व्यायामाचं प्रमाण कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
सर्वसाधारणपणे महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय असतात असा समज आहे.
 
या निष्कर्षासाठी काही कारणं आहेत. घरात मुलांना सांभाळण्याची जबाबदारी सर्वसाधारणपणे स्त्रियाच सांभाळतात. यामध्ये त्यांचा बहुतांश वेळ जातो.
 
स्त्रियांनी व्यायामासाठी तसंच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेळ देण्यासारखी सामाजिक मोकळीक आपल्याकडे नाही. त्यामुळे स्त्रिया शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यात मागे राहतात.
 
कमी व्यायामाचे धोके
शरीराची हालचाल कमी झाल्याने काय धोके निर्माण होतात याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात करण्यात आला आहे.
 
जीवनशैलीशी निगडीत हा आजार आहे. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
 
- हृदयाशी निगडीत विकार
 
- डायबेटिस
 
- लठ्ठपणा
 
- रक्तदाब
 
- कोलेस्टेरॉलची समस्या
 
काम करूनही महिला हालचालींमध्ये पिछाडीवर का?
डॉ. शालिनी यांच्या मते, भारतीय महिलांना स्वत:साठी वेळ काढणं खूप कठीण असतं. अशावेळी थोडं चतुराईने काम करायला हवं. एखादी बाई भाजी खरेदी करायला जात असेल तर तिने चालत जावं. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याचं काम करत असेल तर बाजूला एक स्टूल ठेवावं. ज्यावर चढावं-उतरावं, जेणेकरून थोडा व्यायाम होईल.
 
शहरांमध्ये बहुतांशी कामं यंत्रांच्या माध्यमातूनच होतात. यंत्रांवरचं अवलंबित्व कमी करायला हवं. कणीक मळणं हा उत्तम शारीरिक व्यायाम आहे. मात्र आता सगळ्या गोष्टी यंत्र करत असल्याने आपणच फिट ठेऊ शकतील, अशा गोष्टी कमी करत चाललो आहोत, हा डॉ. शालिनी यांचा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवण्यासारखा आहे.
 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

त्वचा घट्ट आणि तजेलदार दिसण्यासाठी वापरा ज्येष्ठमध पावडरचा फेस पॅक; जाणून घ्या योग्य पद्धत

संपूर्ण शरीरातील वेदना कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय; जाणून घ्या आराम मिळवण्याचे मार्ग

उष्ट्रासनाचे फायदे : पचनक्रिया सुधारण्यासोबत आम्लपित्त आणि पोटाच्या समस्यांवर मिळवा आराम

नैतिक कथा : गोष्ट कंजूस शिंपीची

केमिकल न वापरता तांब्याची काळी पडलेली भांडी ५ मिनिटांत कशी चमकवायची?

पुढील लेख
Show comments