बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (23:33 IST)

आयुर्वेदाप्रमाणे का जेवावे हाताने?

पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत.
आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्त्वाचे अस्तित्व आहे.
अंगठा- अग्नी
तर्जनी- वायू
मध्यमा- आकाश
अनामिका- पृथ्वी
कनिष्का- पाणी
जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाची बोटांना आपसात जोडून तोंडात घास भरतो, याने पंचतत्त्वांचा समतोल होत असून शरीराला मिळणारं अन्न ऊर्जा देणारं असतं. हाताने जेवल्याने आमचा मेंदू आमच्या पोटाला अन्नग्रहण करण्याचा इशारा देतो ज्याने पचन क्रिया सुधारते.
 
हाताने जेवताना आमचं सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित असल्याने शरीराला मिळणारी पोषकता वाढते. याव्यतिरिक्त हाताने जेवण केल्याने तोंड भाजण्याचा धोकाही कमी होतो. कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही याचा अंदाज येतो.