आरोग्यावर घोषवाक्य World Health Day Slogans in Marathi
भारत निरोगी असेल,
तरच भारत पुढे जाईल.
स्वच्छ सुंदर परिसर,
आरोग्य नांदेल निरंतर.
साबणानी हाथ धुवा,
जीवनातून रोग मिटवा.
साफ सफाई करूया,
बिमारी हटवूया.
विचार निरोगी ठेवा,
आनंदी जीवन जगा.
सर्वात मोठी संपत्ती म्हणजे
आरोग्य होय.
शरीर आणि मन यांचे
आरोग्य हे एक आशीर्वाद आहे.
ठेवा साफसफाई घरात,
हेच औषध सर्व रोगात.
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट.
जो घेईल सकस आहार,
त्याला न होई कधी आजार.
खेळ खेळा स्वस्थ रहा.
खावी रोज रसरशीत फळे,
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.
काल्पनिक आजार हा
आजारापेक्षा वाईट असतो.
मोत्या सारखें दात,
त्यांना आरोग्याची साथ.
पालेभाज्या घ्या मुखी,
आरोग्य ठेवा सुखी.
जगण्यासाठी खा,
खाण्यासाठी जगणे नाही.
निरोगी शरीर हाच खरा दागीना.
भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका.
सोयाबिन ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.
निगा राख दातांची,
हमी मिळेल आरोग्याची.
जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटाची वाजंत्री.
रोज एक सफरचंद खावा आणि
डॉक्टर पासून दूर रहा.
जगातील सर्व पैसा
आपले चांगले आरोग्य
परत विकत घेऊ शकत नाही.
आजार येईपर्यंत आरोग्यास
महत्त्व दिले जात नाही.
जो स्वत: वर चांगला
विश्वास ठेवू शकतो,
तो बरा होईल.
सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त.
भेसळयुक्त अन्न खाऊ नका,
आरोग्य धोक्यात आणू नका.
डाळी भाजीचे करावे सूप,
बाळाला येईल सुंदर रूप.
भोजनोत्तर फळांचा ग्रास,
थांबवेल आरोग्याचा ह्रास.
प्रथिने, जीवनसत्वे, क्षार;
यांचे आहारात महत्व फार.
हृदयाचे स्पंदन, आरोग्यदर्शन,
निरोगी हृदय निरोगी जीवन.