गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (17:15 IST)

आपले मुले ही खातात का पोटॅटो चिप्स?

हल्ली पॅक्ड आणि रेडीमेड फूड मुलांची पाहिली पसंत झाली असून व्यस्त असलेले पालकदेखील मुलांनी भूक म्हटले की सोपेरित्या सगळीकडे उपलब्ध असणारे असे काही पदार्थ मुलांना घेऊन देतात. त्यातलाच एक पदार्थ आहे पोटॅटो चिप्स. पण आपल्या हे माहीत आहे का की हे चिप्स मुलांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?


 
हे चिप्स स्वादिष्ट असले तरी आरोग्यावर विपरित परिणाम टाकणारे असतात. हे फक्त पोटासाठीच नव्हे तर पूर्ण शरीरासाठी धोकादायक आहे. काही तज्ज्ञ याची तुलना अल्कोहल किंवा ड्रग्सशी करतात कारण एकाप्रकारे हे एक जीवघेणं व्यसन आहे. एकदा का याची सवय पडली की यापासून दूर राहणे कठिण जातं. यात असे काही पदार्थ समाविष्ट असतात ज्याने हे पुन्हा-पुन्हा खायची इच्छा होते. याचे जास्ती सेवन आपल्या परिवारासाठी धोकादायक आहे.
 
हे जंक फूड असल्यामुळे यातून कुठल्याही प्रकारचं पोषण मिळत नाही. उलट यात भरपूर हानिकारक कॅलरीज असतात. याची सवय पडल्याने अनेक प्रकाराचे शारीरिक विकार उत्पन्न होऊ शकतात. हे ब‍नविण्यासाठी वापरण्यात येणारे सडके बटाटे, लो क्वालिटी तेल आणि अतिरिक्त प्रमाणात टाकण्यात येत असलेल्या मिठामुळे लठ्ठपणा, अन्न न रुचणे, पोटातील विकार, ब्लड प्रेशर, कोलेस्टरॉल, किडनी आणि हृद्यासंबंधी आजार देखील होण्याची शक्यता असते. 
 
फक्त वरतून पडणारे मसाले आणि इतर फ्लेवर्समुळे आपल्याला याची लो क्वालिटी जाणवत नाही. जाहिरातींमध्ये ते लाख म्हणत असतील की हे खूप चांगल्या पदार्थांने निर्मित केलेले असतात पण याची किंमत पाहता आपण ही अंदाजा लाऊ शकता की त्यांना एवढ्यात चांगली क्वालिटी देणे परवडत असेल का?
 
म्हणून लवकरात लवकर याची सवय दूर करून मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.