शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

पेनकिलर्समुळे वाढू शकतो हृदयविकाराचा धोका

आपल्याला काही दुखू लागले की आपण पेनकिलर म्हणजे वेदनाशामक औषध घेतो. काहीवेळा तर डॉक्टरांचा सल्ला न घेताही पेनकिलर औषध घेतले जाते; पण असे करणे धोक्याचे ठरू शकते, असा इशारा अमेरिकेच औषध नियमन संस्थेने दिला आहे. वेदना कमी करणार्‍या आणि ताप कमी करणार्‍या नॉन स्टिरॉडर पेनकिलर्समुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. या औषधांचा वापर सुरू केल्यावर पहिल्याच आठवड्यात त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. 
 
अधिक डोस घेतल्याने किंवा दीर्घकाळ ही औषधे घेत राहिल्यामुळे तर हा धोका आणखी वाढतो, असे फूड अॅन्ड ड्रग अँडमिनिस्ट्रेशनने म्हटले आहे. 
 
गेल्या दहा वर्षातील प्रकरणांचा अभ्यास करून एफडीएने हा निष्कर्ष काढला आहे. एफडीएच म्हणण्यानुसार ज्यांना आधीपासूनच हृदयविकार आहे, त्यांना तर याचा धोका आहेच; पण ज्यांना ही समस्या नाही त्यांनाही पेनकिलर्समुळे हा धोका वाढतो. एफडीएने आता अशा औषधांच लेबलवर या औषधांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असल्याचा इशारा लिहिण्याची सक्ती उत्पादक कंपन्यांवर करण्याचा निर्णय घेतला आहे.