बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2015 (12:07 IST)

मानसिक आजारांपासून वाचण्यासाठी वेळेत करा जेवण

आपलं शरीर हे एक असं मशीन आहे, जे खूप संतुलित काम करतं. वेळेवर जेवण आणि झोपल्यानं आपलं जीवनच चांगलं होत नाही तर आपण मानसिक विकारांपासूनही दूर राहू शकतो. सरकाडियन रिदम्स (शरीरात असलेलं जैविक घड्याळ) 24 तासांच्या चक्राचं पालन करतं आणि हार्मोन किंवा स्वभावासह शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते.

मोंट्रियलचे डगलस मेंटल हेल्थ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट तसंच मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या काई-फ्लोरियन स्टॉर्च यांनी सांगितलं, ‘आपल्या शरीरातील कार्य 24 तासांसह 4 तासांच्या एका चक्रांनी प्रभावित होते, ज्याला अल्ट्रेडियन रिदम्स असं म्हणतात.’

चार तासांचा अल्ट्रेडियन रिदम्स मेंदूमध्ये असलेलं एक मुख्य रसायन ‘डोपामिन’नं प्रेरित होतो. शरीरात जेव्हा डोपामिनची पातळी अनियंत्रित होते, तेव्हा 4 तासांचा रिदम्स 48 तास खेचू शकतो. आनुवंशिक रूपानं हे संशोधन उंदरांवर केलं गेलं. अभ्यासात स्टॉर्च यांच्या टीमनं याबद्दल खुलासा केलाय की, झोप येण्यात होणारा त्रास, अल्ट्रेडियन रिदम्स जेनरेटरमध्ये असंतुलनाचा परिणाम आहे.

जेव्हा की पहिले सर्काडियन रिदम्समध्ये गडबडीचा परिणाम मानला जातो. हे अध्ययन ‘ईलाइक’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.