बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : सोमवार, 7 सप्टेंबर 2015 (16:42 IST)

हे पदार्थ सोबत खाल्ल्याने आरोग्य बिघडत

जेवण छान असेल तर आपल्याला ते आणखी खाण्याची इच्छा असते. तसेच आपल्या आवडीचे सर्व जेवण असले तर ते आपण पोट भरलेले असताना ही खातो. त्यामुळे आपले आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता असते. मात्र खाताना आपण काय खातो त्याकडे जास्त लक्ष नाही देत कशा सोबत ही काहीही खातो. अशा वेळी आपली तब्येत खराब होते. शरीराला अपायकारक ठरणारे फूड आपल्याला माहिती नसतात व आपण त्यांचे न कळत सेवन करतो. त्यासाठी आम्ही तुम्हांला सांगत आहोत काय खाल्ल्याने काय होते. किंवा कशा सोबत काय खाऊ नये.
दुधासोबत दही - दुधासोबतदही खाणे शरीरासाठी खूप हनिकारक आहे. दुध आणि दहयाचा गुणधर्म वेगवेगळा आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्रितपणे खाल्ल्यास पोटाचे विकार होतात. 
चिकनसोबत मिठाई - चिकनसोबत ज्यूस किंवा मिठाईचे एकत्रितपणे सेवन करू नये, यामुळे ही पोटाचे विकार होतात.
कांदा आणि दुध - कांदा आणि दुध कधीही एकत्रितपणे खाऊ नये. कांद्यासोबत दुध घेतल्यास विविध प्रकारचे त्वचा रोग निर्माण होऊ शकतात. 
दही आणि मासे - दहयाचा गुणधर्म थंड आहे हे कोणत्याही गरम पदार्थासोबत खाऊ नये. मासे गरम गुणधर्माचे आहेत. त्यामुळे दही आणि मासे एकत्रितपणे खाऊ नयेत. यामुळे गॅस, अँलर्जी, त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. दहयासोबतच मधसुध्दा गरम गुणधर्म असलेल्या पदार्थासोबत खाऊ नये. 
बटाटे आणि भात - अशा प्रकारचे मिश्रण ही करून कोणा-कोणाला खायला आवडत असते. हे दोन्ही पदार्थ एकत्रित पणे खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. 

जेवणासोबत फळे खाऊ नये - दोन्ही पदार्थाच्या काबरेहायड्रेट आणि प्रोटीनचे पाचन तंत्र वेगवेगळे असते. 
 
लिंबू ,संत्री, अननस, इ. आंबट फळ अँसिडीक असतात. हे दोन्ही पदार्थ एकत्रित खाल्यास पचन प्रक्रिया मंदावते. त्यामुळे हे एकत्र खाऊ नये.
 
उडीद डाळीसोबत दही - उडदाच्या डाळीसोबत दही खाणे टाळावे असे मानले जाते,या पदार्थाचे एकत्रितपणे जास्त सेवन केल्यास हदयाशी 
 
संबंधित आजार निर्माण होतात.त्यामुळे अशा पदार्थाचे एकत्र सेवन करणे कधी ही आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असते.