शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

6 formulas for better health! उत्तम आरोग्याची 6 सुत्रे !

6 formulas for better health! उत्तम आरोग्य लाभावे असे प्रत्येकाला वाटत असते. तंदरूस्त राहण्यासाठी अनेक सुत्रे आहेत. परंतु, आपल्या आरोग्याला ज्याचा फायदा होत असेल त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्याचा अवलंब केला पाहिजे. कोणताही संकल्प करण्‍यापूर्वी तो आपल्याकडून पूर्ण होणार की नाही, याबाबत विचार केला पाहिजे. अन्यथा तो संकल्पही पूर्ण होत नाही आणि अमुल्य वेळही वाया जात असतो.
 
रोज आपण 10 किलोमीटर चालण्याचा संकल्प केला. परंतु, संकल्प करण्यापूर्वी कोणत्याच प्रकारचा विचार केलेला नसतो. त्यामुळे 10 किमीचे अंतर पाहूनच निश्चयाला सुरूंग लागतो. या उलट जर दररोज 1 किमी चालण्याचा संकल्प केला तर 100 टक्के तो पूर्ण करण्यात आपल्याला यश येईल व त्याचा अनुकुल फायदाही आपल्या आरोग्याला होईल.
 
उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक संकल्प करत असतो. परंतु सातत्य न राखल्याने त्याचा पाहिजे तसा प्रभाव पडत नाही. म्हणून पेलवेल असाच संकल्प केला पाहिजे.
 
संकल्पासाठी कोणताही दिवस चालू शकतो. त्यासाठी एक तारखेची वाट पाहण्याची गरज नाही. त्यामुळे हे संकल्प अगदी आजपासूनही सुरू करू शकता.
 
अधिक पाणी प्यावे-
आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीराचे प्रमुख तत्व असून वजनाच्या 60 टक्के अंश पाणी असते. शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाणी आवश्यक असते. दिवसभरात किमान 1.5 लीटर पाणी आपल्या शरीराला आवश्यक असते.
 
आहारातील मीठ कमी करा-
लोणचे, पापड, चटणी, दही, केन्ड सूप यांचे कमी प्रमाणात सेवन करा. कारण त्यात इतर पदार्थांच्या तुलनेत अधिक मीठ असते. रोजच्या आहारातही मीठ कमीच असावे. मीठाचे अतिसेवनामुळे शरीराची हाडे ठिसूळ होतात. दिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ आपल्या शरीरावर विपरीत परीणाम करते. हिरव्या पालेभाज्या व फळे खावीत.
 
वजन कमी करा-
अतिरिक्त वाढलेले वजन धोकादायक ठरू शकते. यातूनच हृदयरोग व मधुमेह यासारखे आजार होण्याची शक्यता असते. लठ्‍ठपणा टाळण्यासाठी आधीपासून संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे. दिवसभरातून एकदा आपले वजन करून पहावे. वजन वाढल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर डॉक्टराचा सल्ला घ्यावा.
 
रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची तपासणी-
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला मुतखडा व हृदयविकाराचा झटका येण्याची भीती अधिक असते. त्यामुळे नियमितपणे रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे.
 
व्यायाम करावा-
व्यायाम केल्याने शरीरात स्फूर्ती जागृत होते. हृदयासोबत शरीरातील मांसपेशी मजबूत होत असतात.
व्यायाम सवय लावल्याने शरीर विकसित होत असते. पोहणे किंवा सायकल चालवणे आदी गोष्टी व्यायाम म्हणून आपण करू शकता.
 
धूम्रपान करू नये-
धूम्रपान केल्याने रक्तदाब वाढतो. व्यायाम करण्याची क्षमता घटते व कर्करोगासारख्या महाभयानक आजाराला तोंड द्यावे लागत असते.