शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (16:27 IST)

Anjeer Milk हिवाळ्यात झोपण्यापूर्वी अंजीरचे दूध प्या, सर्व आजार दूर राहतील

Anjeer Milk अंजीर आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यात व्हिटॅमिन ए, सी, ई, के, फायबर मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे तसेच उच्च प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. 
 
पण तुम्हाला माहित आहे का की अंजीर दुधासोबत खाल्ल्यास त्याचा प्रभाव दुप्पट होतो. दूध कॅल्शियम समृद्ध आहे आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. पण या दोघांचे मिश्रण हिवाळ्यात तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
 
यात इतरही अनेक गुणधर्म आहेत, जे माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात. तसेच रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.
 
रात्री अंजीरचे दूध तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे?
जेव्हा अंजीर दुधात मिसळले जाते तेव्हा ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन नावाची संयुगे तयार होतात, ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. अंजीर मिसळून दूध प्यायल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो.
 
सेरोटोनिन नावाच्या न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीमध्ये ट्रिप्टोफॅनची उपस्थिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सेरोटोनिन हार्मोन तुम्हाला चांगली झोप घेण्यास आणि तणाव कमी करण्यात मदत करतो.
 
अंजीर दूध पिण्याचे आरोग्यासाठी फायदे- पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते- तुम्हाला पचनसंस्थेची समस्या असेल तर अंजीर आणि दूध खूप फायदेशीर ठरू शकते. यात असे गुणधर्म आहेत जे पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात तसेच अपचन, बद्धकोष्ठता, अतिसार, ऍसिडिटी आणि इतर समस्यांपासून आराम देतात.
 
प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते- दूध आणि अंजीरमध्ये झिंक, लोह, मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात, जे प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतात. जर तुम्हाला व्यायाम किंवा कसरत केल्यानंतर खूप थकवा जाणवत असेल तर अंजीर आणि दूध खाणे सुरू करा. यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल.
 
हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते- जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर दररोज अंजीर आणि दुधाचे सेवन करा. हे हृदयाशी संबंधित आजारांपासून तुमचे रक्षण करेल कारण ते हृदय गती नियंत्रित करते. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर याचे सेवन जरूर करा.
 
मासिक पाळीची समस्या दूर होते- मासिक पाळीनंतर अंजीर दुधासोबत सेवन करणे मुलींसाठी देखील फायदेशीर आहे, ज्यामुळे अशक्तपणा आणि इतर संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय अंजीरच्या दुधात हायपोग्लायसेमिक, हेपॅटोप्रोटेक्टिव्ह, अँटीमाइक्रोबियल आणि हायपोलिपिडेमिक गुणधर्म असतात, ज्यामुळे ते हिवाळ्यासाठी चांगले बनते.
 
अंजीरचे दूध कसे बनवायचे-
एक ग्लास दूध उकळवा. 3 ड्राय अंजीर घाला. मिश्रण उकळवा आणि तुमची इच्छा असल्यास केशर देखील घालू शकता.
 
तुम्ही अंजीर अर्धा कप गरम पाण्यात भिजवून आणि नंतर अर्धा कप दुधात उकळून देखील तयार करू शकता.
 
लैक्टोज इंटोलरेंस बाबतीत, तुम्ही अंजीर जसेच्या तसे चघळू शकता आणि ते दुधाच्या पर्यायांसह जसे की सोया मिल्क, ओट मिल्क किंवा बदामाचे दूध पिऊ शकता.
 
याव्यतिरिक्त ताज्या अंजीरांपेक्षा वाळलेल्या अंजीरमध्ये सुक्रोजचे प्रमाण जास्त असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मधुमेह असलेल्या लोकांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या.