बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (22:03 IST)

Diet tips: अस्थमाच्या रुग्णांचा आहार असा असावा

अस्थमाच्या रुग्णांना हिवाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते. विशेष करून त्यांना त्यांच्या आहाराची काळजी विशेष करून घ्यावी लागते. त्यांचा थोडाही निष्काळजीपणा त्यांचा जीव धोक्यात आणू शकतो. वाढत्या प्रदूषणामुळे देखील त्यांना खूप त्रास होतो. वृद्धच न्हवे तर लहान मुले देखील या आजाराला बळी पडत आहे. अस्थमाच्या मूळ कारण म्हणजे वाढणारे प्रदूषण आणि कमकुवत रोग प्रतिकारक शक्ती असणे. 

अस्थमाच्या रुग्णांनी आरोग्यानुसार जीवनशैली व्यवस्थापित केली आणि त्यानुसार आहार घेतला, तर त्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येऊ शकते. दम्याच्या रुग्णाने पपई, केळी, साखर, गहू, अंडी, सोया, तांदूळ आणि दही यांचा आहारात समावेश करू नये. याशिवाय जास्त तळलेले पदार्थही टाळावेत. नाही तर त्रास होऊ शकतो. अस्थमा किंवा दम्याच्या रुग्णांचा आहार असा असावा.
 
हिरव्या भाज्या-
अस्थमाच्या रुग्णांनी आपल्या आहारात शक्य तितक्या हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने फुफ्फुसात कफ जमा होत नाही आणि शरीराला सर्व आवश्यक पोषक आणि जीवनसत्त्वे मिळतात. या प्रकारचा आहार घेतल्यास दम्याचा झटका येण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. 
 
मध दालचिनी-
दालचिनी आणि मधाचे सेवन दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी 2-3 चिमूट दालचिनी मधात मिसळून खाल्ल्यास फुफ्फुसांना आराम मिळतो.
 
डाळी -
 डाळी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. कारण डाळींमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. अस्थमाच्या रुग्णांनी सोयाबीन, काळे हरभरे, मूग डाळ आणि इतर डाळींचे सेवन करावे. त्यामुळे त्यांची फुफ्फुसे मजबूत होतात. त्यामुळे त्यांनी आहारात एक वाटी डाळीचा समावेश जरूर करावा. 
 
तुळस-
तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. याशिवाय याचे सेवन केल्याने शरीराला अँटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. अशा स्थितीत दम्याचे रुग्ण चहामध्ये तुळशीची पाने घालून रोज सेवन करू शकतात. याच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याशिवाय हंगामी आजारांचा धोकाही कमी होतो. 
 
व्हिटॅमिन सी पदार्थांचा समावेश-
अस्थमाच्या रुग्णाने आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे फुफ्फुसांचे संरक्षण करण्याचे काम करते. याशिवाय दम्याचा झटका येण्याचा धोकाही बराच कमी होतो.
 
Edited by - Priya Dixit