सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (10:09 IST)

आपणास श्वासोच्छवासाचा त्रास असल्यास हे उपाय करून बघा

श्वासोच्छ्वास लागण ही सामान्य बाब आहे. जेव्हा आपण एखादी शारीरिक हालचाल करता जी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त असेल जसे की आपण एखादे डोंगर चढताना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास उद्भवू शकतो. याला डिस्पनिया असे ही म्हणतात. या मध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते. तथापि, आरोग्याच्या अनेक समस्यांमुळे श्वास घेण्याची समस्या उद्भवू शकते.
 
हा त्रास श्वसन प्रणाली मध्ये एखाद्या संसर्ग किंवा आजार, हृदयरोग, ब्राँकायटिस, ऍलर्जी आणि अशक्तपणामुळे देखील होऊ शकतो. हे सर्व लक्षणे मुख्यतः फुफ्फुसांचा कर्करोग असणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. चला तर मग आज आपण काही घरगुती उपायांना जाणून घेऊ या, ज्यांचा मदतीने आपण श्वासोच्छ्वासाच्या तक्रारीला दूर करू शकतात.
 
* वाफ घेणं - कधी -कधी कफामुळे देखील श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, म्हणून या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी वाफ घेणं हे एक चांगले पर्याय असू शकतं. श्वास घेतल्यानं नाकाच्या नळ्या देखील स्वच्छ राहतात आणि श्वास घेण्यास काहीही त्रास होत नाही. 
 
* श्वास घेण्यास त्रास होत असल्यास आलं खावं - कफाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आपण आल्याच्या तुकड्यांना चावून चावून खावं किंवा दररोज आल्याचा चहा देखील आपण पिऊ शकता. खरं तर आल्यामध्ये असलेले बरेच घटक कफ किंवा थुंकी काढण्याचे काम करतात, ज्या मुळे श्वासोच्छ्वासाच्या त्रासापासून मुक्ती मिळते.
 
* बिटाचे सेवन करणं फायदेशीर असतं - जर आपण अशक्तपणाच्या त्रासामुळे श्वासोच्छ्वास होण्याच्या त्रासाला अनुभवत असाल तर बिटाचे सेवन करणं आपल्या साठी फायदेशीर होऊ शकतं. वास्तविक, या मध्ये मुबलक प्रमाणात लोह असतं आणि त्याच सह हे फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिनने समृद्ध असतं. हे सर्व घटक चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
 
* शोप हे श्वासोच्छ्वासाच्या त्रासाला दूर करण्याचे एक घरगुती उपाय आहे. या मध्ये असे गुणधर्म आहेत जे कफाला किंवा थुंकीला बाहेर काढतात आणि श्वासाच्या त्रासाला दूर करतात. या मध्ये असलेल्या लोहमुळे अशक्तपणा दूर होतो.
 
* टीप - हा लेख निव्वळ आपल्या माहितीसाठी देण्यात येत आहे. कोणत्याही वस्तूंचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञाचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.