मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (08:31 IST)

हिवाळ्यात शरीर उष्ण ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा

हिवाळ्यात खाण्या-पिण्याची चंगळ असते. या दिवसात आपल्याला आरोग्यवर्धक खाण्यापिण्याचे पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात. आम्ही आपल्याला काही अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत ज्यांचे सेवन केल्यानं आपल्या शरीरास उष्णता मिळते. 
 
बीन्स बेस्ट खाद्य - हिवाळ्यात सोयाबीन खाण्यासाठी सर्वोत्तम आहार आहे. हे प्रथिन आणि फायबरचे चांगले स्रोत आहे आणि त्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक, फास्फोरस, थायमिन, रायबोफ्लेवीन आणि व्हिटॅमिन बी 6 सारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे. 
 
रसाळ फळ - थंडीच्या दिवसात रसाळ फळे आवर्जून खावे, हिवाळयात संत्री, द्राक्षे आणि लिंबू खाल्ल्याने प्रतिकारक शक्ती बळकट होते. हे फळ व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. जे शरीराच्या प्रतिकारक शक्तीला बळकट करतं.
 
डाळी - हिवाळ्यात वरण आवर्जून खावं. दररोजच्या आहारात डाळीचा समाविष्ट करावा. या मुळे शरीरास आवश्यक पोषक घटक मिळतात.
 
नियमानं अंडी खा - हिवाळ्यात नियमानं अंडी खावेत. हे व्हिटॅमिन ए, बी 12,बी 6, ई , के चे उत्तम स्रोत आहे. या मध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, सेलेनियम, फॅटी ऍसिड आणि प्रथिने असतात.
 
सुकेमेवे खाणं महत्त्वाचे आहे - तज्ज्ञांचा मते हिवाळ्यात सुकेमेवे खाणं आवश्यक असते. या मध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, ओमेगा 3 एस, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि निरोगी प्रथिन आढळतात.
 
बटाटे- हिवाळ्यात बटाटे खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. बटाट्यात व्हिटॅमिन बी 6, सी, फोलेट आणि फायबर असतात.