सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 23 ऑगस्ट 2020 (14:06 IST)

Sprouts In Rainy Season : पावसाळ्यात मोड आलेल्या कडधान्यापासून राहावं लांब

तसं तर अंकुरलेले किंवा मोड आलेले कडधान्य आरोग्यास खूप फायदेशीर आहे आणि हे आपल्या आहारात नियमित रुपात समाविष्ट केल्याने आपल्या आरोग्य आणि सौंदर्याचे बरेच फायदे मिळू शकतात. परंतु प्रत्येक निरोगी वस्तू प्रत्येक वेळी एकसारखे परिणाम देईल असे काही जरुरी नाही. होय, अंकुरलेले किंवा मोड आलेले कडधान्य किती ही फायदेशीर असले तरी पावसाळ्यात हे खाणे आपल्यासाठी हानिकारक होऊ शकते.
 
आता आपण विचारात पडला असाल की मोड आणलेले किंवा अंकुरलेले कडधान्य आरोग्यास कसे काय हानिकारक आहे ..तर आम्ही आपणास त्याचे कारण सांगत आहोत. 
 
वास्तविक मेघसरींमध्ये अन्नातून विषबाधा आणि पोट बिघाड होण्याचे त्रास सर्वात जास्त होतात. यामागील सर्वात मोठे कारण पाणी किंवा इतर पदार्थांमध्ये असलेले जिवाणूंमुळे होणारे संसर्ग, जे आपल्या पोटालाच खराब करत नाही तर उलट्या आणि अतिसार सारख्या समस्यांना देखील जन्म देऊन आपल्या साठी धोकादायक ठरू शकतात.
 
आहारतज्ज्ञ या हंगाम्याच्या काळात अंकुरलेले कडधान्य न खाण्याचा सल्ला देतात, याचे पहिले कारण असे की हे बऱ्याच काळ पाण्यात भिजवलेले असतात आणि त्यापेक्षा या मध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहतो अशामुळे त्यामध्ये धोकादायक जिवाणू होण्याचा धोका आणखीनच वाढतो.

दुसरे कारण असे की या मध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. जे पोट स्वच्छ करण्यास मदत करतात. अश्या परिस्थितीत, अतिसार सारखी समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे शरीरात पाणी आणि पोषकतत्वांची कमतरता होऊ शकते. 
 
तथापि, जर आपणास या हंग्यामात अंकुरलेले कडधान्य खावयाचे असल्यास, आपण याला चांगल्या प्रकारे उकळवावे आणि ताजे असताना वापरावे, जेणे करून या मुळे आपणांस काहीही त्रास होऊ नये.