सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (11:49 IST)

बडीशेप खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, बायकांचे सर्व त्रास या मुळे दूर होतात

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात निरोगी राहणं खूप महत्त्वाचे आहे. अशामध्ये आपण दररोज बडीशेपचे सेवन केल्याने शरीरास निरोगी ठेवू शकतो. बडीशेप ही थंड प्रकृतीची असते. मेघऋतूच्या अश्या दमट हवामानात देखील बडीशेपचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आयरन (लोह)आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक पुरेश्या प्रमाणात असतात.जे आपल्या शरीरास पोषण देऊन अनेक प्रकारच्या अडचणी टाळण्यास मदत करतं.
 
या व्यतिरिक्त बडीशेपचा सुवास देखील फायदेशीर आहे, या मुळे आपल्या शरीरात ताजेपणा टिकून राहतो. बडीशेपेचा सेवन केल्याने स्त्रियांच्या शरीरातील अनेक त्रास दूर होतात. गरोदरपणात बडीशेपचे सेवन केल्याने शरीरात दुधाची कमतरता दूर होते.
 
अशामध्ये स्तनपान करविणाऱ्या बायकांना बडीशेपचे सेवन आवर्जून करावे. स्त्रियांनी बडीशेप खाल्ल्याने त्वचा आणि हाडांशी निगडित सर्व समस्या नाहीश्या होतात. बाळाला दूध पाजत असणाऱ्या बायकांना दूध कमी येत असण्याची समस्या असल्यास नियमाने बडीशेपचे सेवन करावं.
 
यामुळे दुधाची कमतरता होण्याच्या त्रासाला आपण सहजपणे दूर करू शकता. या व्यतिरिक्त बडीशेपचे सेवन केल्याने वेळोवेळी होणाऱ्या मासिक पाळीच्या अनियमिततेच्या त्रासाला दूर करू शकता. दररोज बडीशेप खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो आणि निद्रानाश सारखे त्रास देखील दूर होतात.
 
बडीशेप खाल्ल्याने आपली चयापचय (मेटॅबॉलिझम) बळकट होते आणि पोटाचे विकार जसे की बद्धकोष्ठता, गॅस, अपच, सारख्या त्रासांमध्ये देखील आराम मिळतो. त्याच बरोबर वजन देखील नियंत्रणात राहत.