हे 7 पदार्थ नैसर्गिकरीत्या शरीरात डोपामाईनचे प्रमाण वाढवू शकतात, त्यांचा फायदाविषयी जाणून घेऊ या.....

Last Modified बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (12:23 IST)
डोपामाइन हार्मोन आपल्या मेंदूच्या सामर्थ्यासाठी जवाबदार असतो. शरीरात डोपामाईन हार्मोनच्या कमतरतेमुळे थकवा, एकाग्रतेत कमी होणं, विसरणं, झोप न येणं, इत्यादी लक्षणे दिसून येतात.

सफरचंद, केळी, कलिंगड आणि पपई सारखे फळ डोपामाईन वाढविण्यास मदत करतात. हार्मोन शरीरात बनणारे एका प्रकाराचे रसायन(केमिकल) असतात जे रक्ताद्वारे अवयव आणि ऊतकांपर्यंत पोहोचतात आणि शरीराच्या अनेक प्रक्रियेस प्रभावित करतात. हार्मोन मेटाबालिझ्म वजन वाढणे, प्रजनन, लैंगिक क्रिया, मनः स्थिती इत्यादी क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. तज्ज्ञ सांगतात की शरीरात हार्मोन्सची जास्त कमी होणे आरोग्यावर परिणाम करतं. असेच एक हार्मोन आहे डोपामाईन.

डोपामाईन याला मोटिव्हेशनल हार्मोन देखील म्हटलं जातं. हे हार्मोन प्रेरणा आणि मानसिक एकाग्रता देतं. हे असं न्यूरो हार्मोन आहे जे ध्यान, एकाग्रता आणि प्रेरणा सारख्या मानसिक कार्यासाठी जवाबदार असतं. डोपामाईन नैसर्गिकरीत्या मेंदूत तयार होत, परंतु जेव्हा शरीरात याची कमी होते तेव्हा या मुळे एकाग्रतेत कमतरता, थकवा, लक्ष विचलित होणं ,झोपेची कमतरता सारखे लक्षणे उद्भवतात. म्हणूनच, नैसर्गिकरीत्या शरीरात डोपामाईनचे प्रमाण वाढविण्यासाठी योग्य आहार घेणं आवश्यक आहे. इथे अशे 7 पदार्थ आहे जे डोपामाईन वाढविण्यासाठी मदत करतात, ज्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला आनंदी आणि ऊर्जावान वाटेल.

बदाम :
बदाम आणि इतर नट्समध्ये भरपूर प्रमाणात टायरोसीन असते, ज्यामुळे डोपामाइनची पातळी वाढते. तज्ज्ञ सांगतात की बदामाचे गुणधर्म लक्षात घेता याला मेंदूसाठीचा सर्वोत्तम आहार मानला जातो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई मेंदूची सतर्कता वाढवतं आणि स्मरणशक्ती देखील व्यवस्थित राखतो. एवढेच नव्हे तर बदाम मध्ये जिंक देखील भरपूर प्रमाणात असतं जे मेंदूच्या पेशींना हानिकारक हल्ल्या पासून वाचवतं. व्हिटॅमिन बी 6 मेंदूच्या पेशींना दुरुस्त करण्यात मदत करतं. बदाम डोपामाईन आणि एड्रेनालाईन सारख्या मेंदूच्या रसायनाच्या निर्मिती करण्यास मदत करतं जे ध्यान किंवा लक्ष आणि स्मरणशक्तीसाठी महत्त्वपूर्ण असतात. दररोज एक मूठ बदाम खावं.

फळ :
सफरचंद, केळी, जांभूळ, कलिंगड, स्ट्रॉबेरी आणि पपई सारख्या फळांमध्ये डोपामाईनचा उत्पाद वाढविण्यासाठी क्वेर्सेटिन आणि टायरोसीन नसून व्हिटॅमिन सी सारखे जीवनसत्त्व आढळतात.

शाकाहारी प्रथिनं :
आपण शाकाहारी असल्यास सोयाबीन, शेंगदाणे, आणि बीन्स सारखे पर्याय आहेत, जे टायरोसीन चांगल्या प्रमाणात देतात. याच सह डोपामाईन उत्पादनास चालना देतात.

दूध आणि दुधाचे पदार्थ :
पनीर, दूध, दही मुळात हे सर्व दुग्धजन्य पदार्थ टायरोसीनचे एक चांगले स्रोत आहे आणि अश्या प्रकारे हा एक डोपामाईन उत्पादनास चालना देण्याचा चांगला मार्ग आहे.

चॉकलेट :
गोड दोन प्रकारे काम करतं. सर्वात आधी शरीरात फील-गुड हार्मोन सेरोटोनिन तयार होतं. दुसरी गोष्ट, चॉकलेट मध्ये फिनाइलथाईलामाईन नावाच्या कंपाउंडची मात्रा थोडक्या प्रमाणात असते, जे मेंदूच्या पेशींना डोपामाईन सोडण्यासाठी उत्तेजित करतं.

मांसाहार :
चिकन, अंडी आणि मांस पासून मासे आणि कोळंबी पर्यंत प्रथिनांनी समृद्ध असलेले सर्व पदार्थ टायरोसीनने समृद्ध असतात. याचा अर्थ असा आहे की मांसाहार घेतल्याने डोपामाईनची पातळी देखील वाढू शकते.

कॉफी :
कॉफी मध्ये असलेले कॅफिन मेंदूला सतर्क करू शकतं आणि डोपामाईन उत्पादनास वाढण्यास सक्रिय भूमिका बजावतं. म्हणून कॅफिन असलेले पेय पदार्थ प्यायल्यावर जास्त जागृत आणि केंद्रित वाटू लागतं.
टीप : रोगाच्या निदानासाठी दिलेल्या माहितीचा वापर तज्ज्ञांच्या सल्याशिवाय करू नये.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

बॉडी ऑइल आणि बॉडी लोशन मधील फरक जाणून घ्या

बॉडी ऑइल आणि बॉडी लोशन मधील फरक जाणून घ्या
मुली त्वचेच्या काळजी बद्दल खूप सजग असतात

काय सांगता, धावण्याने महिलांना या समस्या उद्भवू शकतात

काय सांगता, धावण्याने महिलांना या समस्या उद्भवू शकतात
धावणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे या मुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक आजार देखील दूर राहतात

लव्ह टिप्स : प्रेम कसे व्यक्त करावे

लव्ह टिप्स : प्रेम कसे व्यक्त करावे
जर आपण एखाद्या मुलीवर प्रेम करता तर तिच्यावर आपले प्रेम कसे व्यक्त कराल या साठी काही ...

घरात गुलाब पाणी कसे बनवायचे सोपी पद्धत जाणून घ्या

घरात गुलाब पाणी कसे बनवायचे सोपी पद्धत जाणून घ्या
जेव्हा देखील गोष्ट येते त्वचेची काळजी घेण्याची तेव्हा गुलाब पाण्याचे नाव आवर्जून घेतले ...

सर्दी पडसं झाले असल्यास या गोष्टींचे सेवन करू नका

सर्दी पडसं झाले असल्यास या गोष्टींचे सेवन करू नका
बरेच लोक सर्दी झाल्यावर औषधे घेतात, परंतु या काळात काय खावे आणि काय नाही