गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (15:02 IST)

Benefits Of Coconut: नारळाचे चमत्कारिक फायदे

नारळ भारतीय घरात पिढी दर पिढींपासून वेगवेगळ्या रूपात वापरण्यात येत आहे. हे एक असे फळ आहे ज्याचा वापर आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी केले जाऊ शकतं. 
 
नारळात आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि फायबर जास्त प्रमाणात म्हणजे 61% असतं. हे आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्याचे काम करतं. प्रतिकारक शक्ती वाढवतं. 
 
नारळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरायला सर्वात चांगले आणि सुरक्षित मानले जाते. हे आपल्या केसांना अधिक निरोगी आणि चमकदार बनण्यास मदत करतं. 
 
नारळापासून नारळाचे तेल मिळतं जे स्वयंपाक करण्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित मानले जाते.
 
नारळाचे चमत्कारिक फायदे : 
नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. असे याला त्याच्या धार्मिक महत्वासह औषधीय गुणधर्मामुळे म्हटले जाते. नारळ व्हिटॅमिन, पोटेशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजाने समृद्ध असतं.
 
* नारळ अनेक रोग बरे करण्यासाठी कामी येतो. नारळात वसा आणि कॉलेस्ट्राल नसतं, म्हणून नारळ लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करतं.
 
* नारळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट, खनिज, आणि क्षार भरपूर प्रमाणात आढळतात.
 
* नारळामध्ये व्हिटॅमिन आणि अनेक फायदेशीर घटक आढळतात. नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील असतं. सुकलेल्या नारळात या घटकांची मात्र कमी असते.
 
* नारळ पाण्याला दररोज आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि त्यापासून होणारे डाग बरे होतात.
 
* रक्तस्रावाची समस्या बऱ्याच लोकांना होऊ शकते. नाकातून रक्त निघत असल्यास कच्च्या नारळाच्या पाण्याचे सेवन नियमितपणे केल्याने फायदेशीर असते. अनोश्यापोटी नारळाचे सेवन केल्याने रक्तस्त्राव थांबतो.
 
* हंगामी परिणामामुळे किंवा चुकीचे खाण्यामुळे होणाऱ्या पोटदुखीमध्ये नारळपाणी प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
 
* उन्हाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने घसा बऱ्याच काळ ओला राहते आणि आपल्याला तहान लागत नाही.
 
* निर्जलीकरण (डिहाइड्रेशन) आणि उलट्यांचा त्रास झाल्यास नारळाच्या पाण्यात मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.
 
* नारळ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. नारळाच्या गीर मध्ये बदाम, आक्रोड आणि खडीसाखर मिसळून दररोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. मुलांना नारळ खाऊ घालावे, या मुळे मुलांचा मेंदू विकसित होतो.