शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (15:36 IST)

या 5 गोष्टी पुन्हा पुन्हा खाण्याची सवय आपल्या शरीरात पोषणाची कमतरता असल्याचे दर्शवते

निरोगी जीवन जगण्यासाठी जीवनशैलीत बरेच बदल करावे लागतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्न कसे आहे. कारण असं म्हणतात की, आपण जसे खातो तसा विचार करतो.कधीकधी काही लोक नेहमी असा दावा करतात की ते यापुढे फास्ट फूड खाणार नाहीत.पण काही दिवस निघून गेल्यावर त्यांना फास्ट फूड खावेसे वाटते.तज्ज्ञांच्या मते, शरीरात जीवनसत्वे, खनिजे किंवा इतर पोषक घटकांच्या कमतरतेमुळे ही लालसा सुरू होते.अशा 5 गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात.कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे ते पदार्थ खाण्याची इच्छा होते?जाणून घ्या.
 
1. चॉकलेट खाण्याची लालसा -
बऱ्याचदा असे दिसून येते की काही लोक चॉकलेटचे वेडे असतात. ते कधीही चॉकलेट खातात. चॉकलेटची इच्छा शरीरात मॅग्नेशियमची कमतरता दर्शवते.मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी पीनट बटर खाऊ शकता. याशिवाय केळी,टोफू,एवोकॅडो हे देखील मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत.
 
2. चिप्स खाण्याची इच्छा होणं - जंक फूड प्रेमींना अनेकदा चिप्स खायला आवडतात.जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा ते बाजारातून चिप्सचे पॅकेट खाऊन पोट भरतात.पण चिप्स खाण्याची सवय शरीरात सोडियमची कमतरता दर्शवते. शरीरात सोडियमचा पुरवठा करण्यासाठी,आहारात अधिक फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे.दुधी, कोथिंबीर,काकडी,कोबी यांचे सेवन केल्याने सोडियम ची कमतरता पूर्ण होते .
 
3. कॉफी पिण्याची इच्छा होणं - काही लोकांना कॉफीची खूप आवड असते.ते दिवसातून सुमारे 5 वेळा कॉफी पितात.शरीराला कॅफीनची गरज असते,पण जास्त प्रमाणात कॉफी पिणे हानिकारक होऊ शकते.कॉफीची वारंवार इच्छा म्हणजे शरीराला कॅफीनची गरज असणे आहे. कॉफी ऐवजी,आपण रात्री गरम काढा देखील पिऊ शकता.ज्यामुळेआपली कॅफिन पिण्याची इच्छा देखील शांत होईल.यासह,रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल.
 
4. कोल्ड ड्रिंक्स पिण्याची इच्छा होणे -कॅफिनची कमतरता असल्यावर ही शरीराला नुकसान देते. जर आपल्याला कोल्ड ड्रिंक्स पिण्याची इच्छा असेल तर याचा अर्थ कॅफीनची कमतरता असणे.हे या ठिकाणी शीतपेयांचा सेवन करणे देखील योग्य नाही.अशा परिस्थितीत आपण हर्बल चहा पिऊ शकता, बर्फाचा चहा पिऊ शकता.ज्यामुळे आपली कोल्ड्रिंक्स पिण्याची लालसाही कमी होईल.कॅफीनच्या कमतरतेमुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळीही कमी होते.ज्यामुळे व्यक्ती चिडचिडी होते,एकाग्रता होण्यास असमर्थ होते.या सारख्या समस्या होऊ लागतात.
 
5. चीझ खाण्याची इच्छा - जंक फूडमध्ये प्रत्येक गोष्ट चीझ ने सजलेली असते. पण जेव्हा चीझ पोटात साचत तेव्हा त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. विशेषतः मुलींसाठी चीझ हानिकारक आहे.चीझ ची भूक शमवण्यासाठी,दह्याचे सेवन केले पाहिजे.खरं तर,चीझ मध्ये कॅल्शियम,सॅच्युरेटेड फॅट आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणातआढळतात.