शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (16:26 IST)

Coronavirus Vaccination : कोरोना लस घेण्यापूर्वी आणि नंतर या 7 गोष्टी करू नका

आता सर्वांचे लसीकरण सुरु झाले आहे.लसीकरण दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निष्काळजी पणा केल्याने हे आपल्याला जड जाऊ शकतं.लसीकरणाचे काही नियम आहेत. ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.जर काळजी घेतली नाही तर लसीकरणाचा परिणाम उलट देखील होऊ शकतो.तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवा .
 
1 अल्कोहलचे सेवन करू नये- लसीकरणापूर्वीच अल्कोहलचे सेवन करू नका. यामुळे लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो. तथापि, लसीकरण करण्यापूर्वी, आपण भरपूर पाणी प्यावे आणि पोट भर जेवून जावे.
 
 
2. पेनकिलर घेऊ नका-लस घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे पेनकिलर घेऊ नका. जर तुम्हाला किरकोळ वेदना होत असतील तर आपण घरगुती उपाय देखील करू शकता. काही औषधे लसीला प्रतिकूल प्रतिक्रिया देखील देऊ शकतात. म्हणूनच, लसीकरणाच्या 24 तासांपूर्वी कोणतेही पेन किलर घेऊ नका, लस घेतल्या नंतरही, डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच औषध घ्या.
 
3. प्रवास करणे टाळा - लसीकरणानंतर, काळजी न करतानिष्काळजी पणाने विनाकारण फिरू नका. जर लसीकरण केले असेल तर आम्हाला आता कोरोना होणार नाही असा भ्रम करू नका. उलट, लसीकरणानंतर आपण कोणत्याही प्रकारचा प्रवास करू शकत नाही. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लसीकरणानंतर प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
4. सिगारेटचे सेवन करू नका - आजचे तरुण चहासोबत जास्त सिगारेट वापरतात, पण आता आपण स्वतःहुन त्यापासून दूर राहा.लसीकरणानंतर,आपण सिगारेट किंवा अल्कोहोल घेऊ शकत नाही.या दोन्हीच्या सेवनाने आपल्या फुफ्फुसांवर आधीच परिणाम झाला आहे.म्हणून,लसीकरणापूर्वी आणि नंतर काही दिवस कोणत्याही प्रकारच्या नशाचे सेवन करू नका.
 
5. रात्री उशिरापर्यंत जागू नका - भरपूर झोप नेहमी आपल्याला निरोगी ठेवते. त्यामुळे लसीकरणापूर्वी आणि नंतर पूर्ण विश्रांती घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरू नका. चांगल्या झोपेमुळे लसीला चांगला प्रतिसाद मिळतो.
 
6. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका - लस मिळाल्यानंतर आपल्याला घरीच राहावे लागेल. गर्दीच्या ठिकाणी कधीही जाऊ नका. हे लसीकरणाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. आपल्याला घरी राहूनच विश्रांती घ्यायची आहे. लसीकरणानंतर 2 ते 3 दिवस कुठेही जाऊ नका.
 
7. त्वरित कार्य करू नका-लसीकरणानंतर अनेकांना काही जाणवत नाही.त्यामुळे ते कामाला लागतात. पण अशी चूक करू नका.आपल्याला बरे वाटत असले तरी काम करू नका. शरीराला विश्रांती द्या.ज्यामुळे लस आपल्याला अधिक लाभ देईल.
 
लसीकरणापूर्वी आणि नंतर हे नियम आहेत जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत.असे करणे आवश्यक आहे हे सर्व नियम सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आले आहेत .जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये. हे काही सामान्य नियम आहेत आणि ते पाळले जाऊ शकतात.
 
 
टीप -ही सामग्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त सामान्य माहिती देण्यासाठी पुरवली आहे, आपण डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या .वेबदुनिया या माहितीवर कुठल्याही प्रकाराचा दावा करत नाही .