शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (20:07 IST)

कारल्याचं रस प्या,आरोग्य आणि सौंदर्य मिळवा

लोकं आपल्या वाढत्या वजनामुळे काळजीत असतात.खाण्या-पिण्यात बदल,व्यायामाचा अभाव असणं याचे कारणे असू शकतात.वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतो,जेणे करून वजन नियंत्रित राहील.कारल्याचं रस आपल्या या समस्येला कमी करू शकतो.
 
कारल्याचं रस किंवा ज्यूस आपल्या वजनाला कमी करण्यात आपली मदत करू शकतो.या व्यतिरिक्त त्याचे अनेक फायदे आहेत.चला तर मग जाणून घेऊ या.
 
* दररोज कारल्याचं रस प्यायल्यानं जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो.कारलं दमा आणि फुफ्फुसांच्या संक्रमणाच्या उपचारासाठी प्रभावी आहे.
 
* कारल्याचं रस मधुमेहाच्या रोगासाठी देखील फायदेशीर आहे.
 
* चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम देखील कारल्याचं रस करतो.जर आपण याचे नियमित सेवन करता,तर कारलं शरीरात रक्त शुद्ध करण्याचे काम करतो.
 
* त्वचेला उजळतो,मुरूम,पुळ्या,पुटकुळ्या इत्यादी समस्यां नाहीशी करतो.