शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (10:47 IST)

पंत प्रधान मोदी 'चहावाले' नाही

भारताचे पंत प्रधान यांना 'चहावाला' म्हणून बऱ्याचदा संबोधित केले जाते.खुद्द पंतप्रधान अनेकदा आपल्या भाषणात आपण चहावाला असल्याचे उल्लेखतात.परंतु त्यांचे थोरले बंधू प्रल्हाद मोदी यांनी स्पष्टच केले की पंतप्रधान मोदी हे चहावाला नसून आमचे वडील चहावाले होते.आपल्याला चहावाला म्हणायचे आहे तर त्यांना चहावाला म्हणा आणि आम्हाला 'चहावाल्याचे मुलं' म्हणून संबोधित करा.
 
प्रल्हाद मोदी मुंबईत उल्हासनगर ट्रेंड असोसिएशन च्या एका कार्यक्रमास आले असताना म्हणाले.आमचे वडील चहावाले होते.आणि आम्ही सर्व बांधव मिळून चहा विकायचो.ज्या दिवशी ज्याच्या नंबर लागेल,त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी असायची.आम्ही चहावाले नव्हे तर आमचे वडील चहावाले होते.आमच्या वडिलांनी आम्हा सहा भावंडांना चहा विकूनच लहानाचे मोठे केले.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाले म्हणून संबोधित करू नये.म्हणायचेच आहे तर आम्हाला 'चहावाल्याचे मुलं' म्हणून संबोधित करावे असा टोला प्रह्लाद मोदी यांनी पत्रकारांना लगावला.