शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (08:18 IST)

'या 'मागणीवर अंमलबजावणी न झाल्यास मनसे रेलभरो आंदोलन करणार

If this demand is not implemented
मुंबईत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी,अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर आता या मागणीवर अंमलबजावणी न झाल्यास रेलभरो आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारला दिला आहे.
 
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्द्यावरून आता राज्य सरकारला इशारा देणारं ट्वीट केलं आहे.“ज्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे,त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी,राज ठाकरेंच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती.नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावं लागेल”,असं संदीप देशपांडे यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.