शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 11 जुलै 2022 (08:02 IST)

Food For Fasting : स्वादासह आरोग्यासाठी उपवासात खावे हे 10 पदार्थ

fasting food
उपवासाच्या वेळी, आपल्याला हे समजत नसल्यास की काय खावं जे उपवासात देखील कामी येईल आणि आरोग्यवर्धक असेल. तर चला आज आम्ही इथे आपल्याला अश्या 10 उपवासाच्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे चवदार तर आहेच त्याच बरोबर आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले आहेत.
 
1 आपली इच्छा असल्यास तर फळ आणि भाज्या एकत्रित करून सॅलड किंवा कोशिंबीर बनवू शकता, चव येण्यासाठी त्यावर सैंधव मीठ आणि काळी मिरपूड वापरू शकता. यामुळे आपले पोट देखील लवकर भरेल आणि चव पण मिळेल.
 
2 जर आपणास साबुदाण्याची खीर आवडत नाही, तिखट देखील आवडत नसल्यास, तर आपण साबुदाण्याची गोड खिचडी बनवून देखील खाऊ शकता. ह्याला साजूक तूप आणि साखर टाकून बनवतात आणि हे ताकद देखील देत.
 
3 बटाट्याचे चिप्स किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्या ऐवजी, कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ वापरावं. ह्याला आपल्या चवीप्रमाणे तिखट किंवा गोड बनवता येतं. यासह आपण काही फळ किंवा काकडी घेऊ शकता.
 
4 बटाट्यांचा जास्त वापर करण्याऐवजी आपण दह्यात कुट्टुचे पीठ, शेंगदाण्याचा कूट आणि बटाटे घालून आमटी बनवू शकता. हे चविष्ट आणि आरोग्यासाठी चांगली असते.
यापासून गॅस आणि पोटाच्या अन्य त्रासांना रोखता येईल.
 
5 कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठाची पुरी बनविण्याऐवजी आपण ह्याची पोळी देखील बनवू शकता. हे आरोग्यास जास्त फायदेशीर असणार.
 
6 उपवासात आपण साबुदाण्याची खिचडी बनवून खात असल्यास, आणि साबुदाणा आपल्यासाठी हानिप्रद असल्यास, आपण या सोबत दह्याचा वापर करू शकता. या पासून आपल्याला अतिरिक्त ऊर्जा मिळेल आणि दही पोटाच्या विकारांना दूर करण्यास मदत करेल. या मुळे पुन्हा-पुन्हा तहान पण लागणार नाही.
 
7 आपणास तळकट आणि मसालेदार खावयाचे नसल्यास, तर आपण दूध आणि केळीने बनवलेले मिल्कशेक दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता. या मुळे भूक लागणार नाही आणि संपूर्ण दिवस ऊर्जा राहील.
 
8 फ्रुट रायता देखील आपली गरज पूर्ण करण्यास मदत करेल. दह्यामध्ये आपल्या आवडीनुसार फळ आणि ड्राय फ्रुट्स घालून रायतं बनवू शकता. या मुळे आपल्याला ताकद आणि ऊर्जा मिळेल.
 
9 ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा आणि कॅलरी दोन्ही मिळेल. कमी प्रमाणात घेतल्याने देखील आपल्याला अजून काहीही खाण्याची गरज भासणार नाही.
 
10 आपल्याला जर काही पेय पदार्थच घ्यावयाचे असल्यास, कुट्टू आणि शिंगाड्याच्या पिठाची दूध घालून गोड कढी किंवा आमटी करू शकता. या व्यतिरिक्त रताळ्याच्या शिरा आणि उकळून घेतलेलं रताळं आपल्या शरीरास दीर्घकाळापर्यंत ऊर्जा देण्यास मदत करतात.