रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (23:07 IST)

ढेमसे टिंड्याचे फायदे जाणून, नक्कीच सेवन कराल

ढेमसे किंवा टिंडे नाव घेताच बहुतेक लोक तोंड बनवू लागतात. ही भाजी बहुतेकांना आवडत नाही. कदाचित तुम्हाला टिंडे आवडत नसतील, पण त्याचे फायदे ऐकल्यानंतर तुम्हीही या भाजीचे सेवन करायला लागाल.
 
आयुर्वेदात ढेमसे ह्याला टिंडे देखील म्हणतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. टिंड्यात फायबर, व्हिटॅमिन सी, लोह, कॅरोटीनॉइड्स, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. टिंड्याच्या भाजीचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांमध्ये फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊ या.
 
ढेमसे किंवा टिंडा वजन कमी करण्यास उपयुक्त  
वजन कमी करण्यासाठी ढेमस्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर फायबर असते. यासोबतच ढेमसे मध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त आहे. वजन कमी करण्यासाठी ढेमस्याची भाजीचे सेवन करू शकता.
 
पचनसंस्थेसाठी फायदेशीर टिंडे 
ढेमस्याचे सेवन आपल्या पचनसंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. ढेमस्याच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होतात.
 
टिंडे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर -
ढेमस्याचे सेवन आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. या मध्ये असलेले पोषक तत्व हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.ढेमस्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते.