गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

उभ्या उभ्या पाणी पित असाल तर 5 नुकसान जाणून घ्या

Dos and Donts Explaining How to Drink Water
बरेच लोक उभं राहून आणि घाईघाईत चालताना पटकन पाणी पितात, पण तुम्ही ज्या स्थितीत पाणी पितात त्याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो हे तुम्हाला माहीत नसेल.
 
चला जाणून घेऊया उभे राहून पाणी पिण्याचे तोटे -
 
1. उभे राहून पाणी प्यायल्याने ते पाणी दाबाने पोटात जाते आणि या पाण्याची अशुद्धता मूत्राशयात साठते ज्यामुळे शरीराच्या किडनीला गंभीर नुकसान होते.

2. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा अन्ननलिकेद्वारे दाबाने पाणी पोटात झपाट्याने पोहोचते आणि पाण्याच्या दाबाने पोट आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाचे आणि आपल्या पचनसंस्थेचे नुकसान होते.

3. उभे राहून पाणी पिल्याने आपल्याला तृप्ति वाटत नाही, तहान नीट शमत नाही आणि त्यामुळेच आपल्याला वारंवार तहान लागते.

4. उभे राहून पाणी पिण्याचाही आपल्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो कारण त्यामुळे आपल्या फूड पाइप आणि विंड पाइपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.

5. जे लोक नेहमी उभे राहून पाणी पितात, त्यांना फुफ्फुस आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. म्हणून उभे असताना कधीही पाणी पिऊ नका, कारण पाण्याचा दाब तुमच्या शरीराच्या संपूर्ण जैविक प्रणालीवर परिणाम करतो.

6. उभे राहून पाणी प्यायल्याने ते शरीरातून जाते आणि सांध्यांमध्ये जमा होते. ज्यामुळे हाडे आणि सांधे धोक्यात येऊ शकतात. यामुळे सांध्यातील द्रवपदार्थाच्या कमतरतेमुळे, वेदनासह अशक्तपणा येऊ लागतो. कमकुवत हाडांमुळे, व्यक्तीला संधिवात सारखे आजार होऊ शकतात.

7. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण उभे राहून पाणी प्यायल्याने तुमचा ताणही वाढू शकतो. खरं तर आपण उभे राहून पाणी प्यायलो तर त्याचा थेट परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होतो. अशा प्रकारे पाणी प्यायल्याने पोषक तत्व पूर्णपणे निरुपयोगी होतात आणि शरीरावर ताण येतो.
 
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.