गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (21:28 IST)

केळी खाण्याचे 5 फायदे

महाराष्ट्रासह देशातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी केळी एक आहे. याचे अनेक प्रकार आहेत.
केळ्यांमध्ये भरपूर पोषक असतात. शरीराला ऊर्जा देणारे कर्बोदके आणि हृदय मजबूत ठेवणारे पोटॅशियम असतं.
गोड, पिवळ्या रंगाची केळी जास्त मिळतात. हिरवी केळीही आपल्याकडे उपलब्ध आहेत. हिरवी केळी बहुतेक भाजी म्हणून वापरली जातात.
 
केळ्यांमध्ये 80 ग्रॅम पोषक घटक आढळतात
 
ऊर्जा: 65 kcal
प्रथिने: 1 ग्रॅम
चरबी: 0.1 टक्के
कर्बोदकं: 16.2 ग्रॅम
फायबर: 1.1 ग्रॅम
पोटॅशियम: 264 मिलीग्रॅम
 
केळ्यांचे फायदे
केळ्यांमध्ये पेक्टीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आतड्यांचं काम सुधारतं. अन्न पचन प्रक्रियेला मदत होते. फायबर शरीरातलं कोलेस्टेरॉल कमी करतं.
 
केळ्यांमध्ये फायबर असल्याने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं. ज्या गोष्टी पचायला कठीण असतात त्या केळ्यांमधल्या कर्बोदकांमुळे पचन प्रक्रियेला मदत करतात.
 
केळ्यांमुळे जीवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन देतं. असिड निर्मितीत योगदान देतं.
 
हृदय सुरक्षित- केळ्यांमध्ये पोटॅशियम असतं. शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाइट्सपैकी एक आहे. यामुळे हृदयाचं काम सुधारतं. शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन राहतं.
 
रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असल्याचं सिद्ध झालं आहे.
 
साहजिकच केळी खाणं शरीराला फायदेशीर असतं.
छातीतली जळजळ- केळी पोटातल्या असिडचं संतुलन राखतं. ल्युकोसायनिडिन आतड्याचे पातळ आवरण घट्ट होण्यास मदत करते. पिकलेली केळी छातीत जळजळीपासून आराम देते.
 
ऊर्जा- केळी शरीराला उच्च उष्मांक ऊर्जा प्रदान करते. इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.
 
फायबरसह सुक्रोज, फ्रक्टोज, ग्लुकोज शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात. पोटॅशियम स्नायूंच्या हालचालींना मदत करते आणि पेटके कमी करते.
तणाव कमी करतं- केळीमध्ये आढळणारे ट्रिप्टोफॅन हे अमिनो अॅसिड शरीराद्वारे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते, जे मेंदूला शांत करण्यास मदत करते.
 
हे सेरोटोनिन मेंदूला आराम करण्यास मदत करते. हे तणाव दूर करते आणि उत्साही करते.
 
केळी कोण खाऊ शकतं?
हो, प्रत्येकजण केळी खाऊ शकतो. काहींना केळ्याचा त्रास होऊ शकतो. जसं काहींना मायग्रेनचा त्रास होतो. काहींना अलर्जी असू शकते. तुम्हाला अलर्जी असेल तर केळं खाल्ल्यावर काही मिनिटात त्रास होऊ लागतो. अशा प्रकारच्या ऍलर्जींना अॅनाफिलेक्सिस म्हणतात. असे झाल्यास, त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
 
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फार केळं खाऊ नये.
 
काही औषधं रक्तातली पोटॅशियमची पातळी वाढवू शकतात. अशी औषधे वापरत असल्यास, केळीसारखे पोटॅशियम जास्त असलेले पदार्थ खाण्यापूर्वी काळजी घ्या.
 
Published By- Priya Dixit