1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Chapati at Night रात्री पोळी खाण्याचे तोटे जाणून व्हाल सावध

Disadvantages of Eating Chapati at Night काय आपण देखील रात्रीच्या जेवणात पोळ्या खाता? तर अनेकांचे उत्तर होय असेच असेल. पण रात्री पोळी खाणे हानिकारक असू शकते का? कारण पोळ्यामध्ये कॅलरी आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे. अशा स्थितीत रात्री ते खाणे थोडे जड होते. याशिवाय जेव्हा शरीर पोळी पचवण्यास सुरु होते तेव्हा साखर सोडते जी झोपल्यानंतर रक्तात मिसळते आणि शरीरासाठी हानिकारक असू शकते.
 
डायट एक्सपर्टप्रमाणे पोळीत कॅलरीज आणि कार्ब्स दोन्ही अधिक प्रमणात असतात. अशात रात्री पोळी खाणे जड जाऊ शकतं.
 
रात्री जास्त पोळ्या खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात? Eating roti at night side effects
1. वजन वाढवू शकते पोळी
एका लहानश्या पोळीत 71 कॅलरीज असतात. जर रात्री आपण दोन पोळ्या घरी खाल्ल्या तर सुमारे 140 कॅलरीज. नंतर त्यासोबत खात असलेल्या पदार्थांमुळे आपल्या शरीरात अजूनच कार्बोहाइड्रेट वाढेल आणि आपलं वजन जलद गतीने वाढू शकतं. रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही चालत नसाल तरी ते तुमच्यासाठी जास्त हानिकारक ठरू शकते.
 
2. पोळीमुळे शुगर वाढते
रात्री पोळ्या खाल्ल्याने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. यामुळे मधुमेह आणि PCOD ग्रस्त लोकांसाठी आणखी समस्या उद्भवू शकतात. पोळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते ज्यामुळे इन्सुलिनच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि ही साखर शरीराच्या इतर भागांना हानी पोहोचवू शकते.
 
3. वाईट मेटाबोलिज्म
पोळीत सिंपल कार्ब असताता ज्यामुळे आपलं मेटाबोलिज्म खराब होऊ शकतं. इतकंच नाही तर त्याचा तुमच्या आतड्याच्या हालचालीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री पोळीऐवजी फायबरयुक्त पदार्थ खा जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि ते लवकर पचतात.
 
तर हे सर्व तोटे लक्षात घेऊन रात्री 2 पेक्षा जास्त चपात्या खाण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी आपण अधिकाधिक भाज्यांचे सेवन केले पाहिजे जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. तसेच काही आरोग्यासंबंधी समस्या असल्यास पोळी खाणे टाळणे देखील योग्य ठरेल.
 
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य गृहितांवर आ‍धारित आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा.