शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (17:33 IST)

हिवाळ्यात मिश्र धान्याने बनलेल्या पोळया खा आणि 5 फायदे जाणून घ्या

मल्टी ग्रेन किंवा मिश्र धान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे मिश्र धान्य गहू,हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका,बार्ली, सोयाबीन,तीळ,इत्यादी  एकत्र दळून पीठ तयार केले जाते. त्याचे गुणधर्म जाणून घेतल्यावर आपण त्याचा उपयोग करण्यास सुरु कराल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 मल्टीग्रेन पीठ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ आपल्या शरीरात एकाच वेळी विविध पोषक तत्वांची पूर्तता करतात, तर आपल्याला सामान्य पिठात मर्यादित पोषण मिळते.
 
2 मिश्र धान्याचा वापर केल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं , ज्यामुळे आपल्या पचनसंस्था उत्तम कार्य करण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
 
3 जेव्हा शरीराला जास्त फायबर मिळतं, तेव्हा ते वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्यामुळे आपण लवकर सड पातळ होऊ शकता.
 
4 मल्टीग्रेन अनेक पोषक तत्वांचा पुरवठा करते ज्या मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि आजारांना आपल्यापासून दूर ठेवते.
 
5 याचा एक विशेष फायदा देखील आहे की ते मधुमेह आणि रक्तदाब रुग्णांसाठी फायदेशीर आहे आणि शरीरात चरबी जमा होऊ देत नाही.