सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2019 (19:29 IST)

अक्रोडॅचे सेवन करा आणि हृदय निरोगी ठेवा

अक्रोड रक्तदाब आणि त्याच्या प्रभावाला नियंत्रित करते. अक्रोड एक उत्तम दर्जाचे खाद्य आहे. यापासून आपल्या शरीराला हवे ते प्रोटीन तर मिळतातच, मात्र त्याचे आणखी काही फायदे आहेत. अक्रोड तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाऊ शकता. अक्रोडचा उपयोग गोड पदार्थांमध्ये सजावटीसाठी केला जातो.

मूड ठीक करणे किंवा झोप लागत नसेल तर त्यावरही अक्रोड लाभकारी आहे.

अक्रोडमध्ये असलेले फॅट नैराश्य कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो.

अटॅशन, डेफिसिटी सारखे आजारही याचे सेवन केल्यास कमी होतात.

अक्रोडमध्ये असणारे मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील इन्सुलिन संवेदनासाठी चांगले असतात.

आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा तरी अक्रोड मधुमेह रुग्णांनी सेवन करावे. त्यामुळे ३0 टक्के मधुमेह कमी होण्याची शक्यता आहे.

अक्रोडमध्ये असणारे विविध घटक आणि त्याचे तेल तणावाशी लढण्यात मदत करते.

अक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात.