रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

रोज सकाळी भिजवलेले गहू खाल्ल्यास होतात अनेक फायदे

भिजवलेले गहू खाल्ल्याने पाचन तंत्र सुरळीत राहण्यासाठी मदत मिळते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पाचन तंत्र समस्या मुक्त ठेवण्यास मदत करतात.
 
उन्हाळयात आपण आपल्या डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवे. आज आम्ही तुम्हाला गहू भिजवून ते खाल्ल्यास कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही गव्हाच्या पोळ्या खाल्ल्या असतील पण आज सबंध गहू खाण्याचे फायदे जाणून घ्या. गव्हामध्ये फाइबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नाशीयम , पोटॅशियम आणि फॉस्फोरस सारखे अनेक पोषकतत्व असतात. जे तुम्हाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी मदत करतात. रोज सकाळी भिजवलेले गहू खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच डायबिटीज आणि हृद्यसंबंधित समस्या दूर होतात. तर चला भिजवलेले गहू खाण्याचे फायदे कोणते जाणून घेऊ या. 
 
चांगले डाइजेशन-
गहू भिजवून खाल्ल्यास डाइजेस्टिव सिस्टम मजबूत होते. यामध्ये फाइबर भरपूर प्रमाणात असते, जे डाइजेस्टिव प्रोसेसला चांगले ठेवण्यास मदत करते. भिजवलेले गहू रोज खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि अपचन समस्या दूर होतात. 
 
वेट लॉस-
भिजवलेले गहू खाल्ल्यास वजन कमी होते. भिजवलेल्या गव्हामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.ज्यामुळे भूक कमी लागते. तसेच तुम्ही ओवरईटिंग पासून दूर राहू शकतात. यासोबत याचे सेवन मेटाबॉलिज्मला बूस्ट करते, ज्यामुळे लठ्ठ पणा नियंत्रीत होतो.
 
हृदयाला ठेवते आरोग्यदायी-
भिजवलेले  गहूं हृदयासाठी चांगले असतात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड, अँटीऑक्सीडेंट्स, मॅग्नाशीयम आणि जिंक चांगल्या प्रमाणात असतात. याचे सेवन उच्च रक्तचाप आणि कोलेस्ट्रॉलच्या स्तराला कमी करण्यासाठी मदत करते. 
 
डायबिटीजसाठी फायदेशीर-  
भिजवलेले गहू खाल्ल्यास डायबिटीजची समस्या दूर होते. याचे सेवन ब्लड शुगरची मात्रा कमी करते.  यामध्ये असणारे फायबर शरीरामध्ये अचानक इंसुलिन स्पाइक होण्यापासून थांबवतात, ज्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांना याचा फायदा होतो.
 
गहू भिजवूंन कसे खावे? 
याकरिता एक मूठ गहू रात्री पाण्यामध्ये भिजत घालावे, सकाळी रिकाम्या पोटी याला खाऊ शकतात. याशिवाय, तुम्ही गेहू भिजवून सलाड सोबत मिक्स करून याचे सेवन करू शकतात. भिजवलेले गहू खाल्ल्यास अनेक लाभ मिळतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik