बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे 5 नुकसान

गरम चहाचे शौकीन लोकांची कमी नाही. आलं, तुळस, लवंग, वेलची आणि दालचिनी सारख्या वस्तू घालून आरोग्याच्या दृष्टीने चहा पिणे उत्तमही आहे. परंतू काय आपण रिकाम्या पोटी चहा पिता का? जर आपले उत्तर हो असेल तर जाणून घ्या याचे 5 नुकसान:
1. रिकाम्या पोटी चहा पिण्याच सर्वात मोठे नुकसान म्हणजे अॅसिडिटी. रिकाम्या पोटी गरम चहा पाचक रसांवर प्रभाव टाकतो.
 
2. पचन तंत्र कमजोर होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे रिकाम्या पोटी गरम चहाचे सेवन. ही समस्या दररोज रिकाम्या पोटी चहा पिण्याने उद्भवते.

3. रिकाम्या पोटी चहा पिण्याने आपली भूक प्रभावित होते किंवा भूक लागणे बंद होतं. अशाने आपण आवश्यक पोषणापासून वंचित राहतात.
 
4. अती उकळलेला चहा आरोग्यासाठी आणखी नुकसान करतं, कारण यात कॅफीन अधिक मात्रेत असते आणि ही रिकाम्या पोटावर प्रभाव टाकते.
 
5. पोटात किंवा श्वास नळीत जळजळ, उलटी येणे, जीव घाबरणे अश्या समस्या रिकाम्या पोटी चहा पिण्याने उद्भवतात.
 
या सर्व समस्यांपासून वाचण्यासाठी चहासोबत बिस्किट, ब्रेड, टोस्ट असे काही पदार्थ खायला पाहिजे.