शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

कंबरदुखी दूर करण्यासाठी अंडरविअर

कंबरदुखीचा त्रास असणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे की आता केवळ स्मार्ट अंडरविअर घातल्याने यापासून मुक्ती मिळू शकेल.
 
अमेरिकेतील वँडरबिल्ट युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी बायोकॅनिक्स आणि विअरेबल तकनीकने स्मार्ट अंडरविअर तयार केली आहे जी कंबरदुखीवर प्रभावी आहे. अशात कंबरदुखीचा त्रास सहन करणार्‍यांसाठी ही अंडरविअर अगदी वरदान सिद्ध होईल.
 
नायलॉन कॅनवास, लायक्रा पोलीसतर आणि इतर प्रकाराच्या कपड्याने तयार केलेल्या या अंडरविअरचे दोन्ही बाजू मजबूत पट्ट्यांनी जुळलेले आहेत. कंबरच्या खालील बाजूला नैसर्गिक रबराचे तुकडे आहे. विशेष म्हणजे याला अॅपद्वारे नियंत्रित करता येऊ शकतं. हे ब्लूटूथद्वारे ही कार्य करतं.
 
ही अंडरविअर घालून कुठलेही कामं केली तरी लोअर बॅकवर विपरित परिणाम होणार नाही. याने कंबरदुखीचा त्रास तर दूर होईलच तसेच पाठीचे स्नायूंचा ताण दूर होईल आणि थकवाही जाणवणार नाही.