रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

टूथपेस्ट, साबणाचा वापर पुरुषांसाठी ठरतोय घातक

टूथपेस्ट, साबण, डिओडोरंट, डिटर्जट अशा नित्याच्या वापरातील वस्तू पुरूषांसाठी घातक ठरत असल्याचे नव्या संशोधनातून आढळले आहे. या रोजच्या वापरातील वस्तूंत असलेली रसायने नपुंसकत्व येण्यास कारणीभूत ठरत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या रोजच्या वापराच्या वस्तूत असलेली विषारी रसायने स्पर्म सेलची क्षमता कमी करत असल्याचे आढळून आले आहे. कोपनहेगन विद्यापीठातील हॉस्पिटल प्रोफेसर नील्श शॅकबॉय यांनी सांगितल्यानुसार रोजच्या वापरातील साबण, पेस्ट, अशा 96 पैकी 30 उत्पादनांत केटस्पर प्रोटिनचा प्रभाव असतो आणि त्यांचा व एंडोस्क्रीन केमिकलशी संबंध येतो. केटस्पर प्रोटीन हे शुक्राणूंच्या गती नियंत्रणाचे काम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. पेस्ट साबणासारख्या वस्तूंतील रसायनांमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात व परिणामी नपुंसकत्व येण्यास ती कारणीभूत ठरतात.