शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (22:53 IST)

या 5 गोष्टी कधीही लहान मुलांना खाऊ घालू नयेत, जाणून घ्या

जोपर्यंत लहान मुलं बोलण्यात,चालण्यात आणि समजण्यात  सक्षम होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या अन्नाची काळजी घेणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण उत्साहात येऊन मुलांना असं काही खाऊ घालतो जे त्यांच्या आरोग्यासाठी 
चांगल नसतं आपण असं विचार करून मुलांना खाऊ घालतो की बघू या ते काय प्रतिक्रिया देतात. परंतु ते इतके लहान असतात की त्यांना काही त्रास झाल्यावर ते सांगू देखील शकत नाही.चला जाणून घेऊ या की लहान मुलांना कोणत्या 5 गोष्टी चुकून देखील खायला देऊ नये. 
 
1 मसालेदार पदार्थ- मुलांना वेळीच मसालेदार पदार्थ दिले जातात. जर आपण त्यांना वेळेच्या आधीच तिखट आणि मसालेदार पदार्थ खाऊ घातले तर मुलांना छातीत जळजळ,अपचन आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
 
2 कॅंडीज -कॅंडी हे खाण्यात गोड असतात परंतु हे लहान मुलांना जो पर्यंत त्यांचे दात येत नाही खायला देऊ नये .असं म्हणतात की कॅंडीज मध्ये कन्फेक्शनरी चे प्रमाण जास्त असतात या मुळे लहानग्या वयातच साखरेचे प्रमाण वाढते. म्हणून मुलं 4 वर्ष  किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे  होत नाही.तो पर्यंत त्यांना  अनारोग्यदायी पदार्थ खायला देऊ नये.
 
3 सॉफ्ट ड्रिंक- या ड्रिंक ने पाचन सहज होत मान्य आहे. परंतु उत्साहात येऊन मुलांना सॉफ्ट ड्रिंक प्यायला देऊ नये.या मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतात.या मुळे मुलांच्या वाढीस अडचणी उद्भवू शकतात.
 
4  फळे आणि भाज्या-  कच्च्या भाजीमुळे शरीराला फायदा होतो परंतु ते मुलांसाठी योग्य नाही. मुलांना उकडलेल्या भाज्या नेहमी खायला द्या. जेणेकरून ते सहज पचवू शकतील .आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका होणार नाही.फळे देखील त्यांना बारीक चिरून खायला द्या.
 
5 अंडी- असे म्हणतात की सुमारे 6 महिन्यांनंतर  मुलांना अंडी खायला दिली जाऊ शकतात.परंतु असं चुकून देखील करू नका.6 महिन्याचं मुलं खूप नाजूक असतं .डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच  त्यांना खायचे पदार्थ द्या .अंडी खाऊ घालू नका या मुळे मुलांना संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
 
टीप- ही माहिती सामान्य आहे. मुलांच्या आहाराची सुरुवात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा. 
 
 
 
 
---