शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (11:12 IST)

एका दिवसात किती बदाम खावेत? बदाम खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

आरोग्याप्रती सहज लोकं सकाळी उठल्यावर बदाम खातात. बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. बहुतेक डॉक्टर बदाम खाण्याचा सल्ला देतात, कारण फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक बदामामध्ये पुरेशा प्रमाणात आढळतात. बदामामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तुम्ही रोज बदाम खाल्ले तर तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून स्वतःचा बचाव करू शकता. मात्र हे लक्षात घेण्यासारखे आहे की बदाम मर्यादित प्रमाणात खावेत, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात. चला जाणून घेऊया बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे?
 
बदामातून कोणते पोषक तत्व मिळतात?
व्हिटॅमिन ई: बदाम हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे, जो त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
मॅग्नेशियम: बदामामध्ये मॅग्नेशियम असते, जे हाडे आणि स्नायूंसाठी फायदेशीर आहे.
पोटॅशियम: बदामामध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
फायबर: बदामामध्ये फायबर असते, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते.
प्रथिने: बदामामध्ये प्रोटीन असते, जे स्नायू तयार करण्यास मदत करते.
हेल्दी फॅट्स: बदामामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
अँटीऑक्सिडंट्स: बदामामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
कॉपर: बदामामध्ये तांबे असते, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असते.
झिंक: बदामामध्ये झिंक असते, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असते.
 
रोज बदाम खाणे का महत्त्वाचे आहे?
बदामामध्ये रिबोफ्लेविन आणि एल-कार्निटाइन सारखे घटक असतात, जे विशेषत: मेंदूच्या पेशींची दुरुस्ती आणि मेंदू सक्रिय ठेवण्याचे काम करतात. याशिवाय यामध्ये प्रोटीन असते, जे मेंदूचे कार्य सुधारते. हे खाल्ल्याने मेंदूच्या पेशी तीक्ष्ण होतात आणि स्मरणशक्ती वाढते.
हृदयरोगींसाठी बदाम खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही दिवसातून 2 भिजवलेले बदाम खाल्ले तर तुमचे कोलेस्ट्रॉलही सामान्य राहते.
बदाम खाणे तुमच्या त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही रोज बदनाचे सेवन केले तर तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि तुमचे केस देखील मजबूत होतील. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात.
जर तुम्हाला मधुमेह असेल तर बदाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, कारण ते रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी करू शकतात आणि त्यात मॅग्नेशियम देखील भरपूर आहे.
 
एका दिवसात किती बदाम खावे?
वय आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून एका दिवसात बदाम खाण्याचे प्रमाण बदलू शकते-
18 वर्षांवरील लोक रोज 6 ते 8 बदाम खाऊ शकतात.
जे लोक जास्त सक्रिय असतात ते दररोज 12 बदाम खाऊ शकतात.
5 ते 10 वर्षे वयोगटातील मुले दररोज 2 ते 4 बदाम खाऊ शकतात.
 
बदाम खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
बदाम खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्त्यापूर्वी. सकाळी बदाम खाऊन दिवसाची सुरुवात करा आणि दिवसभर उर्जेने परिपूर्ण रहा.
 
बदाम खाण्याची योग्य पद्दत
बदाम अनेक प्रकारे सेवन केले जाऊ शकतात. तुम्ही बदाम कच्चे देखील खाऊ शकता. तरी अधिक फायदे मिळविण्यासाठी, बदाम नेहमी भिजवून आणि सोलून खावे. भिजवल्यानंतर खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि अधिक पोषक तत्वे मिळतात.
 
अस्वीकरण : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.