suvichar

बद्‍धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी केवळ तीन सवयी बदला

Updated: सोमवार, 17 जून 2019 (12:38 IST)
 
या प्रकाराची समस्या दूर करण्यासाठी लोकं गरम पाण्यात हिंग, ओवा आणि काळं मीठ घोळून पितात. या घरगुती उपायाने निश्चित आराम मिळतो पण तात्पुरता कारण या समस्यांसाठी मूळभूत कारण आहे आपली लाइफस्टाइल, तर जाणून घ्या कशा प्रकारे आपण यावर नियंत्रण ठेवू शकता-
 
1. बाहेर खाणे टाळा
कामाच्या व्यस्ततेमुळे आपण बाहेरचा आहार अधिक प्रमाणात घेत असाल तर हे टाळा. अनेक लोकांना बाहेरच्या खाण्याची चट देखील लागलेली असते परंतू दररोज मसालेदार, तेलकट, स्पाईसी, अती प्रमाणात कॅलरीजयुक्त आहार घेणे योग्य नाही. बाहेरचा अन्न पौष्टिक नसतं आणि स्वच्छतापूर्वक तयार केलेलं देखील नसतं. त्यात वापरलं जाणारं तेल आणि मसाले पचवण्यासाठी शरीराला अती मेहनत घ्यावी लागते आणि पचन दुरुस्त नसल्यास गॅसची समस्या उद्भवते.
 
2. चावून-चावून खा
आपण लहानपणी नेहमी ऐकलं असेल की प्रत्येक घास चावून-चावून खाल्ला पाहिजे. घाईघाईत जेवू नये. उभे राहून जेवू नये. किंवा टीव्ही बघत जेवू नये. पण खरंच या सवयी बदलल्या तर आरोग्यावर उत्तम परिणाम दिसून येतील. अनेक लोकं जेवण गिळून जातात कारण त्यांना घाई असते. धावपळीच्या या काळात किती जरी घाई असली तरी आहारासाठी योग्य वेळ देणे फारच गरजेचे आहे. कारण गिळलेलं अन्न पचवण्यासाठी शरीराला अधिक कष्ट घ्यावं लागतं. अशात गॅस तयार होऊ लागते. म्हणून कधीही आहार घेताना चावून-चावून खाणे अती आवश्यक आहे. हे काम घाईत करू नये.
 
3. मेडिसिन
औषधांचे सेवन केल्याने गॅस तयार होते. खरं म्हणजे प्रत्येक औषधांचे काही न काही साइड इफेक्ट्स असतात. अँटीबायोटिक घेतल्याने पोटाची पचन शक्ती दुरुस्त ठेवणारे 'गुड बॅक्टेरिया' ची संख्या कमी होते आणि यामुळे अन्न पूर्णपणे पचत नाही. पोट साफ नसल्यामुळे गॅस्ट्रिक ट्रबलला सामोरा जावं लागतं. अशात डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. डॉक्टर आपल्याला देत असलेल्या मेडिसिनचं साइड इफेक्ट्स कशा प्रकारे कमी करता येतील यावर सल्ला देऊ शकतात. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments