चण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या
चणे भिजवलेले पाणी आपण सारेच जण टाकून देतो. पण हे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे.
* शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी काळ्या चण्यांचे पाणी खूप फायदेशीर ठरते.
* सकाळच्या वेळी अनशापोटी चण्याचे पाणी प्यायल्यास भूक कमी लागते त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते.
* बद्धकोष्ठता, अपचन या समस्यांमध्ये रात्रभर चणे पाण्यात भिजवून त्याचे पाण सकाळी उठल्यावर प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
* सतत लघवीला जावे लागत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी चण्याच्या पाण्याचा उपयोग होतो. दिवसभरात कमीत कमी 2-3 वेळा हे पाणी प्यावे.
* मधुमेहग्रस्तांनी काळ्या चण्याचे पाणी प्यायला हवे, त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही.
* अशक्तपणा असलेल्या व्यक्तीने चण्याचे पाणी पिणे हा एक चांगला उपाय आहे. शरीरात रक्तशुद्धी करून नवीन रक्त निर्माण करण्याचे काम करते.