शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Overthinking ओव्हर थिंकिंगला मुळापासून नष्ट करण्यासाठी पाच टिप्स

Overcome Overthinking
ओव्हर थिंकिंगला कमी करण्यासाठी या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. 
 
* ओव्हर थिंकिंग पासून वाचण्यासाठी आपले विचार इतरांशी शेअर करा. 
* तुमच्या मनात येणाऱ्या निगेटिव्ह विचारांना एका डायरित लिहा. 
* मेडिटेशनच्या मदतीने ओव्हर थिंकिंगला कमी करू शकतात. 
* दुसऱ्या कामांमध्ये तुमचे लक्ष केंद्रित करा आणि शक्य असल्यास रिकामे न बसता काहीतरी काम करा. 
* तुमच्या ट्रिगर पॉइंटला जाणून घ्या तसेच त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. 
 
Overthinking Solution आजच्या काळात अधिकतर लोकांना आपल्या आयुष्यात स्ट्रेस जाणवतो. वाढत्या स्ट्रेस मुळे लोकांमध्ये मेंटल स्ट्रेसची समस्या वाढते आहे. फक्त स्ट्रेस नाही तर लाइफस्टाइल, रिलेशनशिप तसेच चुकीचे खाण्यापिण्याने मेंटल हेल्थ वर परिणाम होत आहे. सोबतच आजच्या काळात लोक ओव्हर थिंकिंगचे शिकार होत आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे एखाद्या बद्द्ल किंवा एखद्या विषयाबद्द्ल अधिक विचार करणे. खुप लोकांना ओव्हर थिंकिंगमुळे ऐंग्जायटी आणि स्ट्रेटची समस्या निर्माण होते आहे. यात जरुरी आहे लवकरात लवकर ओव्हर थिंकिंगला कंट्रोल करणे.
चला जाणून घेऊया कसे आपण ओव्हर थिंकिंगला कमी करू शकतो. 
 
१. गप्पा करा- सगळ्यात जास्त ओव्हर थिंकिंग कमी बोलण्याने आणि दुसऱ्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतल्याने होते. अशात आवश्यक आहे की आपल्या विचारांना समोर मांडा. जर तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटताय किंवा समोरच्याचे म्हणणे समजत नाहीये तर लगेच परत विचारा. तसेच आपल्या घरच्यांशी व मित्रांशी आपले विचार शेअर करा. अशाने गैरसमज दूर होतील व तुमचे मन हलके होईल.
 
२. निगेटिव्ह विचारांना लिहून काढा- खुप वेळेस आपण आपल्या विचारांना प्रकट करण्यात असक्षम असतो. तसेच आपण आपले म्हणणे सांगू शकत नाही असे वाटते की आपल्याला कोणी समजून घेणार नाही यात आवश्यक आहे की आपण आपले निगेटिव्ह विचार लिहून काढावे. मग या विचारांना वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हाला खुप बर वाटले व स्ट्रेस लेव्हल कमी होईल.
 
३. मेडिटेशन करा- ओव्हर थिंकिंगला कमी करण्यासाठी विचारांवर काम करणे गरजेचे आहे. मेडिटेशनच्या मदतीने विचारांना कंट्रोल करू शकतात. ध्यान केल्याने मेंदूचा विकास होतो आणि स्ट्रेस लेव्हल कमी होते. तुम्ही इंटरनेटवर मेडिटेशनचे म्युझिक ऐकून ध्यान लावू शकतात.
 
४. दुसऱ्या कामांमध्ये मन गुंतवा- म्हणतात की 'खाली दिमाग शैतान घर' तसेच तुम्ही जेव्हा फ्री असतात तेव्हा ओव्हर थिंकिंग जास्त प्रमाणात वाढते व त्यामुळे निगेटिव्ह विचार डोक्यात जास्त येतात आणि एकच विषयाचे विचार करतात. यात महत्वाचे आहे की तुमचे मन दुसऱ्या कामत गुंतवा.
 
५. ट्रिगर पॉइंट ओळखा- ट्रिगर पॉइंट अशी गोष्ट आहे जी तुमच्या ओव्हर थिंकिंगला वाढवते. तुम्ही तुमच्या ट्रिगर पॉइंटला ओळखा. कुठल्या गोष्टीने लगेच वाईट वाटते ? कुठल्या गोष्टीने इनसिक्योर होतात ? त्याच बरोबर सगळ्यात जास्त स्ट्रेस कुठल्या गोष्टीने होतो किंवा कुठल्या कामाने येतो ?  हे जाणून घेणे गरजेचे आहे कारण तुम्हाला समस्याच महित नसेल तर तुम्ही उपाय शोधू शकणार नाही.