शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (09:35 IST)

दातांची निगा कशी घ्याल

व्यक्तीचे सुंदर दात त्याची हसण्यावरून त्याचा परिचय करून देतात. त्याचे दात मोत्यासारखे सुंदर दिसत असतील तरच तो चारचचौघामध्ये हसू शकतो नाही तर त्याला हसण्यात बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे मोत्यांसारखी मिळालेल्या दातांची आपण योग्य पद्धतीने निगा घेतली पाहिजे. जर त्याकडे आपण दूर्लक्ष केले तर दातांवर काळे डाग पडून त्यास किडा लागू शकते व जेवण करताना दात दुखत असतील किंवा चावण्यास त्रास होत असेल तर तत्काळ दातांच्या डाँक्टरांकडे दाखवून उपचार घेतले पाहिजे.
 
जेवणानंतर किंवा पदाथर् खाल्ल्यानंतर दातांना चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले पाहिजे. दातांना योग्य वेळी जर स्वच्छ केले नाही तर जिंजीवाइटिस, पीरियोडेंटिस सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जिंजीवाइटिसमध्ये हिरड्यांना सूज येऊन दुखतात व लालबुंद होतात. जिंजीवाइटिसवर योग्य उपचार जर झाला नाही तर पीरियोडेंटिस सारखी धोकेदायक समस्येला सामोरे जावे लागते. हिरड्या व दात यांच्याशी जोडलेला जो भाग असतो तो नष्ट करण्याचे काम पीरियोडेंटिसचे कीटक करीत असतात. त्यामुळे दात खिळखिळे होतात.
 
या समस्यांपासून सुटण्यासाठी हे करून पाहा :-
 
* दिवसभरातून दोन वेळा साधारण सकाळी व रात्री जेवणानंतर दात चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले पाहिजे. यासाठी चांगला टूथब्रश वापरला पाहिजे. तीन ते चार महिन्यातून तो बदलवला पाहिजे कारण काही काळानंतर तो खराब होतो व ब्रश करताना हिरड्यांना इजा होते.
* दात स्वच्छ करताना योग्य पद्धत वापरली पाहिजे. टूथब्रश 45 अंशाच्या कोनात दातांवर फिरविला पाहिजे.
* मंजनचा वापर करून देखील दात स्वच्छ होत नसतील तर फ्लोराइड दंत मंजन वापरले पाहिजे.
* जेवणानंतर पाण्याची गुळणी करून दात स्वच्छ केले पाहिजे. त्याने दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण निघून जातात.
* माउथवाशचा देखील प्रयोग आठवड्यातून दोन-तीन वेळा केला पाहिजे. त्याने तोंडाची दुर्गधी येत नाही.
* जेवणानंतर फ्लौसने देखील दातांची पूणॅ स्वच्छता केली पाहिजे. फ्लौस वापरण्याची एक वेगळी पद्धत असते. फ्लौस एक यंत्र असून त्याला एक धागा बांधलेला असतो. तो धागा दातांच्या मध्ये अडकवून दातावर जमा झालेली घाण स्वच्छ करता येते.
* जिंजीवाइटिसचा आजार दूर करण्यासाठी 'क' व 'ड' जीवनसत्त्व तसेच लवंगाचे तेल यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे.
* दातांच्या स्वच्छते करिता खीरा, गाजर, मुळा तसेच सफरचंद चावून चावून खाल्ल्याने फायदा होऊ शकातो.