रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2024 (16:21 IST)

उन्हाळ्यात शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त आहात, हे घरगुती उपाय करतील मदत

उन्हाळ्यात घाम येणे ही सामान्य गोष्ट आहे. घाम आल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. पण घामामुळे शरीराचा वास देखील येऊ शकतो. तुम्ही देखील उन्हाळ्यात शरीराला येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे चिंतीत असाल तर हे घरगुती उपाय नक्की अवलंबवा.  
 
बेकिंग सोडा- बेकिंग सोडा एक नैसर्गिक डायोडोरेन्ट आहे. जे घामाच्या दुर्गंधीला दूर करण्यासाठी मदत करतो. अंघोळीच्या पाणयात 1 कप बेकिंग सोडा टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. 
 
लिंबू- लिंबामध्ये अँटीबॅक्टीरिअल गुण असतात. जे घामामधून निर्माण होणाऱ्या बॅक्टीरियाला नष्ट करतात. अंघोळीनंतर शरीरावर लिंबाचा रस लावावा. 10-12 मिनिट ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवून घेणे.    
 
एलोवेरा- एलोवेरामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टीरिअल गुण असतात. जे घामाच्या वासाला दूर करतात आणि त्वचेला आरोग्यदायी बनवतात. अंघोळीनंतर त्वचेवर एलोवेरा जेल लावावे. 
 
हे घरगुती उपाय व्यतिरिक्त तुम्ही काही अन्य गोष्टींकडे देखील लक्ष ठेऊ शकतात. 
मोकळे आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे. 
दिवसातून 2-3 वेळेस अंघोळ करावी. 
भरपूर प्रमाणात पाणी पिणे.
कांदा , लसूण , मसालेदार पदार्थ कमी खावे. 
नियमित व्यायाम करणे. 
हे उपाय करून पाहिल्यास उन्हाळ्यात शरीरातून येणाऱ्या घामापासून तुम्ही सुटका मिळवू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik