उन्हाळ्यात दररोज आहारात दह्याचा समावेश करा, दह्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात. अतिशय चविष्ट असण्या व्यतिरिक्त, ते पोषक, व्हिटॅमिन्स प्रोटीन आणि कॅल्शियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. यामध्ये दह्याचे सेवन करणे देखीलआरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात रोजच्या आहारात दही समाविष्ट केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून सुरक्षित ठेवण्यास उपयुक्त मानले जाते. दही प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे.दह्यात सर्व पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम असते. उन्हाळ्यात दर रोज दही खाण्याचा सल्ला दिला जातो.चला जाणून घेऊ या उन्हाळ्यात दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
1 उन्हाळ्याचे दुष्परिणाम कमी करते -उन्हाळ्यात दररोज दही खाणे आपल्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. दही हलके पण खूप पौष्टिक आहे. हे हायड्रेटेड ठेवण्यासोबतच शरीरातील उर्जेची पातळी वाढवण्यातही मदत करते . उन्हाळ्यात दही खाल्ल्याने ऊन आणि उष्माघाताचे दुष्परिणामही सहज टाळता येतात. ताजेपणा देण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
2 पचनासाठी फायदेशीर -दह्याच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे त्याचा पचनक्रियेवर होणारा परिणाम. दह्यामध्ये आढळणारे पोषक घटक आतड्यांतील हेल्दी बॅक्टेरियाला प्रोत्साहन देतात जे अन्नाचे योग्य पचन करण्यास मदत करतात आणि अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या कमी करतात. उन्हाळ्यात बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटात जळजळ या समस्यांपासून दूर राहण्यासाठी दररोज याचे सेवन करा.
3 त्वचेसाठी फायदेशीर -उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो, त्यामुळे दररोज दही खाणे एक चांगला पर्याय मानला जाऊ शकतो. दही खाण्यासोबत चेहऱ्यावर लावल्यानेही फायदा होतो. उष्णतेच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी दह्याचे फेस पॅक चेहऱ्यावर लावतात. त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी हे उपयुक्त असतात.
4 मनःस्थिती राखण्यासाठी उपयुक्त-ज्यांना अनेकदा तणाव-चिंतेची समस्या असते त्यांच्यासाठी दररोजच्या आहारात दह्याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. दही मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते, जे चिंता आणि तणावात आराम देते. दही हे उत्तम मूड-लिफ्टर म्हणूनही ओळखले जाते. रोजच्या आहारात दह्याचा समावेश करणे हे खूप फायदेशीर ठरू शकते.