1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (19:29 IST)

आरोग्यासाठी फायदेशीर असणारे किवी फळ

health tips in marathi  beneficial kiwi fruit
किवी असं फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले आहे. चवीत आंबट गोड असणारे हे फळ ज्याचे मूळ स्थळ चीन आहे, पण ह्याची लागवड भारतात बऱ्याच ठिकाणी जसे की हिमाचल प्रदेश , जम्मू काश्मीर, सिक्कीम, उत्तरप्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये केली जाते. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये काहीही फेकण्यासारखे नाही. म्हणजे आपण ह्याला साली बियाणे सह खाऊ शकता आणि हे संपूर्ण फळ खाणच फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊ या या फळाच्या फायद्या बद्दल.
 
1 निद्रानाश ची समस्या दूर करतो- 
हे फळ निद्रानाशाची समस्या ला दूर करण्यात फायदेशीर आहे. वास्तविक या मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि सेरोटोनिन मुबलक प्रमाणात आढळतात  आणि तज्ज्ञ सांगतात की शरीरात सेरोटोनिन च्या कमतरतेमुळे निद्रानाशाचा  त्रास होतो. म्हणून जर आपण ह्या समस्येपासून सुटका मिळवू इच्छिता तर किवीचे सेवन करावं.
 
2 रोग प्रतिकारक शक्ती वाढवितो- 
किवी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यात उपयुक्त मानले जाते. या मध्ये व्हिटॅमिन सी आणि विविध पॉलिफेनालच्या उपस्थितीमुळे प्रतिकारक क्षमता वाढविण्यात मदत करतो म्हणून दररोज कीवीचे सेवन करणं फायदेशीर असू शकत. 
 
3 हृदयासाठी फायदेशीर आहे- 
संशोधनात आढळले आहे की या फळामध्ये असलेले व्हिटॅमिन, खनिजे, अँटीऑक्सीडेंट आणि पॉलिफेनाल हृदय संबंधित आजाराचा धोका कमी करतो. किवी चे दररोज सेवन केल्यानं हृदयाला सुरक्षित ठेवतो आणि हृदय रोगाचा धोका टळतो.
 
4 बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो -
किवी बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यात देखील प्रभावी आहे. या फळामध्ये फायबर सह पोट स्वच्छ करण्याचेही गुणधर्म आढळतात. या फळाचे दररोज सेवन केल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या लोकांना कोणत्याही त्रासाशिवाय विष्ठा काढण्याची प्रक्रिया सहज होते.