रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

आरोग्य टिप्स : अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे या टिप्स अवलंबवा

नेहमी असं होत की अंघोळ करताना कानात पाणी शिरतं, जे काढण्यासाठी नको ते प्रयत्न केले जाते. जेणे करून कानातून पाणी बाहेर निघावं. पण कधी-कधी कानातून पाणी  बाहेरच निघत नाही ज्यामुळे संसर्ग होण्याची भीती असते. जर आपल्या देखील कानात पाणी जात आणि त्याचा त्रास होतो  तर आज आम्ही सांगत आहो काही असे सोपे टिप्स ज्यांना अवलंबवून आपण या त्रासापासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* डोकं वाकवून पाणी काढा- 
जर अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे तर या साठी आपण आपले कान त्या बाजूने वाकवा आणि दुसऱ्या हाताने हळुवार पणे डोक्याला हिसका द्या. असं केल्याने कानात गेलेले पाणी बाहेर निघत.
 
* इयर बड्स वापरा-
कधी स्विमिंग करताना तर कधी शॉवर घेताना कानात पाणी जात. अशा परिस्थितीत आपण इयर बड्स वापरू शकता. या साठी ह्याला हळुवार हाताने वापरावे. इयर बड्स एकदम कानात घालू नका. 
 
* उडी मारा-
कानातील पाणी कधी-कधी उडी मारल्याने देखील निघते.तसेच धावल्याने देखील कानात गेलेले पाणी बाहेर निघते. या साठी आपण एक ते दोन मिनिटे वेगानं धावावे. असं केल्यानं कानात गेलेले पाणी बाहेर निघण्याची दाट शक्यता आहे.
 
टीप :लक्षात ठेवा की जर कानात पाणी गेले आहे आणि कानात वेदना जाणवत असल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा.