शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (22:38 IST)

benefits of 'Mosambi' ‘मोसंबी’चे फायदे जाणून घ्या

Mosambi
मोसंबी हे फळ मूळचे भारतीय नव्हे. मोझांबिक बेटाचे नावावरून याला मोसंबी हे नाव पडले असले तरी याचे मूळ स्थान चीन आहे. या फळाचा रस चवीला मधुर, पाच्य (पचावयास हलका) पण कफकारक असला तरी शक्‍तिवर्धक, भूक व तृषाशामक आहे. थोडी मिरपूड व मीठ लावून घेण्याने कफाचा प्रादुर्भाव होत नाही. काही वेळेस रस कोमट करून घेण्याचा वैद्य सल्ला देतात. दीर्घ आजारात शक्‍ती भरून येण्यासाठी तसेच जेव्हा पचनयंत्रणा कमकुवत झालेली असते; अशावेळी या रसाचा सातत्याने उपयोग केला जातो. 
 
रस घेण्यामुळे पोटातील आम्लता दूर होते, भूक लागते व पचनाच्या तक्रारी दूर होतात. 
 
शरीरात कोणत्याही कारणाने रक्‍तदोष निर्माण झाला, तर काही दिवस तरी नियमाने रस घ्यावा. 
 
बस, ट्रेन, बोट लागण्याची सवय असल्यास प्रवासात अधूनमधून साल काढून कापटी चोखत राहावे; त्रास जाणवत नाही.
 
मोसंबीची साल सावलीत वाळवून त्याची मडक्‍यात घालून राख करावी. उलटी होत असल्यास अर्धा चमचा राख मधातून उलटी थांबेपर्यंत 1/1 तासाचे अंतराने चाटवावी.
 
कफ प्रकृतीचे व्यक्‍तींना शक्‍तिवर्धक म्हणून रस घेणे असल्यास गरम करून, ग्लासभर रसात 2 चमचे आल्याचा रस टाकून घ्यावा, कफाचा प्रादुर्भाव होत नाही.
 
फुलांपासून मोसंबीचे सुवासाचा अर्क काढून अत्तर तयार करण्यासाठी वापरतात व याला खूप मागणी असते. 

Edited by : Smita Joshi