शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (10:45 IST)

Swelling on feetपायांवर सुज येण्याचे मुख्य कारण जाणून घ्या

Swelling on feet काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणत: लघवीचे विकार असणार्‍यांचे पाय सुजतात असे मानले जाते. मात्र पाय सुजणे हे मधुमेहाचे सुद्धा लक्षण असू शकते. आपली पावले हा शरीराचा खालचा भाग आहे आणि या भागापासून रक्त वर वाहण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम व्हावे लागते. तसे ते झाले नाही की, पायाकडचा रक्त पुरवठा जास्त होतो आणि पाय सुजतात.
 
साधारणपणे घोटे आणि तळवे सुजतात. अर्थात पावले सुजण्याची अनेक कारणे आहेत. महिलांच्या बाबतीत गरोदर अवस्थेत पावले सुजतात.
 
रक्तदाबाने सुद्धा पावले सुजू शकतात. अशा पाय सुजण्यावर खालीलप्रकारचे पाच उपाय करावेत. ते सर्व घरगुती उपचार आहेत.
१) एका बकेटात पाणी घेऊन त्या पाण्यात पेपरमींट ऑईल अगदी थोड्या प्रमाणात टाकावे. युकॅलिप्टस्चा सुद्धा वापर होऊ शकतो. 
अशा पाण्यात आपले पाय बुडवून ठेवावे. मोठा दिलासा मिळू शकेल.
२) रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजले असतील तर मालीश करावे.
३) अशाच रितीने मिठाच्या पाण्यात सुद्धा पाय बुडवून ठेवता येतात. त्यानेही सूज कमी होते.
४) उताणे झोपावे आणि आपले पाय एका उशीवर उंच ठेवावेत. त्याने रक्तप्रवाह उलट्या दिशेने सुरू होतो. खुर्चीवर बसून टेबलावर काम करण्याची सवय असेल तर पाय ठेवायला काही तरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे.
५) भरपूर पाणी प्यावे.