शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 23 मे 2021 (09:45 IST)

सर्दी पडसंचा त्रास असल्यास फायदेशीर आहे पातीचा कांदा

कांदा आपण सॅलड म्हणून खालले असेल. पण आपण कधी पातीचा कांद्याची भाजी खालली आहे ? जर नाही तर याचे फायदे माहित झाल्यावर आपण ते नक्कीच खाणार. 
 
1 पातीचा कांदा खाण्याचे बरेच फायदे आहेत. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवते. त्यात अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. बॅक्टेरियातील प्रतिरोधक गुणधर्मांमुळे ते खाल्ल्याने पचन सुधारते. पातीच्या कांद्यात क्रोमियम असते.
 
2 पातीचा कांदा  खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. पातीचा कांदा चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करतो. हे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. पातीचा कांदा मॅक्रोन्यूट्रिशियन टिकवून ठेवतो.
 
3 केस गळतीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी पातीचा कांदा खूप प्रभावी आहे. कांद्याचा रस केसांवर मालिश केल्यास केस गळणे थांबते. याव्यतिरिक्त कांद्याची पेस्ट लावल्याने पांढरे केस लहान वयातच काळे होण्यास सुरवात होते.
 
4 उन्मादग्रस्त रुग्ण बेशुद्ध झाल्यास त्याला कांदा कापून त्याचा वास द्या. या मुळे रुग्ण शुद्धीत येतो. पातीच्या कांद्यात देखील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-हिस्टॅमिन गुणधर्म देखील असतात, म्हणूनच संधिवात आणि दम्याच्या रूग्णांसाठी हे फायदेशीर आहे.
 
5 लघवी थांबली असेल तर दोन चमचे कांद्याचा रस आणि गव्हाचे पीठ घेऊन शिरा तयार करा. शिरा  गरम झाल्यावर पोटावर पेस्ट लावल्यास लघवी सुरू होते. कांद्याला पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्याने  लघवीशी संबंधित समस्या देखील नाहीशा होतात.
 
6 सर्दी किंवा पडसं झाले असेल तर कांदा खाल्ल्याने आराम मिळतो.
संधिवात मध्ये कांदा खूप फायदेशीर आहे. मोहरीचे तेल आणि कांद्याचा रस मिसळा आणि मसाज केल्याने फायदा होतो. मोतीबिंदू, डोकदुखी, कान दुखणे आणि साप चावणे यासारख्या बर्‍याच सामान्य शारीरिक समस्यांमध्येही कांदा औषध म्हणून कार्य करते. कांद्याची पेस्ट टाचांच्या भेगा पडल्यास त्यावर लावल्याने फायदा होतो.